शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
2
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
3
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देताहेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
4
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
5
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
6
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
7
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
8
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
9
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
10
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
11
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
12
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
13
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
14
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
15
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
16
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
17
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
18
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
19
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
20
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी

निवडणुकीच्या नावाखाली सरकारची आर्थिक कोंडी

By admin | Updated: October 19, 2016 06:17 IST

सहा महिन्यांपैकी साडेचार ते पाच महिने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता राहणार असल्याने सरकार वेगळ्याच आर्थिक संकटात सापडले

यदु जोशी,

मुंबई- देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत अर्थसंकल्पातील केवळ २६ टक्केच निधी खर्च केलेला असताना उर्वरित सहा महिन्यांपैकी साडेचार ते पाच महिने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता राहणार असल्याने सरकार वेगळ्याच आर्थिक संकटात सापडले आहे. राज्य निवडणूक आयोगाने काल चार टप्प्यांमधील नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू केली. ती तब्बल ८२ दिवस चालणार आहे. या काळात सरकारला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. जनतेला थेट प्रलोभन ठरू शकेल असा कोणताही निर्णयदेखील घेता येणार नाही. बहुतेक विभागांना त्यांच्यासाठी अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी शक्य तितक्या लवकर वितरित करण्याचे धोरण फडणवीस सरकारने अवलंबिले आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात २० ते ९० टक्क्यांपर्यंतचा निधी वितरित करण्यात आला आहे. तथापि, आर्थिक वर्ष संपायला साडेपाच महिने बाकी असताना सरासरी २६ टक्के इतकाच खर्च झाला आहे. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता ९ जानेवारी २०१७ पर्यंत असेल. त्यानंतर काहीच दिवस मोकळा श्वास मिळत नाही तोच जिल्हा परिषद निवडणुकीची आणि त्याला जोडून महापालिका निवडणुकीची आचारसंहिता डोक्यावर असेल. पर्यटन ९ टक्के, जलसंपदा ७ टक्के, अन्न व नागरी पुरवठा १० टक्के, पाणीपुरवठा १६ टक्के, ऊर्जा, तर उद्योग विभागाचा १८ टक्केच निधी आतापर्यंत खर्च होऊ शकला आहे. बरेचदा आचारसंहितेचा फायदा बजेटला कट लावण्यासाठी सरकारला होतो. मात्र या सरकारसाठी आचारसंहिता ही अडसर ठरली आहे. कारण नवीन कामेही हाती घेता येणार नाहीत. आचारसंहिता लागू होताना सुरू असलेल्या कामांवरच निधी खर्च करण्याचे बंधन असेल. >बहुतांश मंत्री नाराजराज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत आचारसंहितेच्या कालावधीबाबत बहुतेक मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उर्वरित सहा महिन्यांपैकी पाच महिने आचारसंहितेत जाणार असतील तर कामे होतील कसे असा सगळ्यांचा सूर होता. या बाबत राज्य निवडणूक आयुक्तांना विनंती करून आचारसंहितेत ढिल द्यावी. ती टप्पानिहाय आणि निवडणूक असलेल्या नगरपालिकांमध्येच लागू करावी, अशी विनंती सरकारतर्फे आयोगाकडे करण्यात येणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. >विभाग व त्यांनी केलेला खर्च (एप्रिल ते आॅक्टोबर) विभाग तरतूदखर्च निधीटक्केवारीगृह १६०८८६३९१३९.२७सार्वजनिक बांधकाम १०८७४८५२ ७.८४वने व महसूल१३९५३२५३९ १८.२०ग्रामविकास१५६९९४५२२ २८.८४सहकार २०१३४२६ २१.१८महिला व बालकल्याण२५७१११२३ ४३.६७ गृहनिर्माण२११९५२.८२ २.४९ आदिवासी विकास७७८१ १५८२ २०.३२सामाजिक न्याय१२२४१३४१० २७.५८शालेय शिक्षण४३९२०२०४९३ ४६.६६ (आकडे कोटी रुपयांमध्ये)