शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

शाहीस्नानसाठी पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय बेकायदेशीर

By admin | Updated: December 23, 2016 04:53 IST

सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय बेकायदेशीर आहे. हा निर्णय जलधोरण

मुंबई : सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय बेकायदेशीर आहे. हा निर्णय जलधोरण २००३च्या अगदी विसंगत आहे, असा निर्णय गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला.सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान शाहीस्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा आदेश मुख्य सचिवांनी २८ जानेवारी २०१६ रोजी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तथापि, हा आदेश जलधोरण २००३शी विसंगत असल्याने तो बेकायेशीर ठरतो, असे न्या. अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले.दुष्काळी स्थितीत पाणी कशाप्रकारे सोडण्यात यावे, याबद्दलचा तपशील जलधोरण २००३मध्ये देण्यात आला आहे. पिण्यासाठी, दैनंदिन कामासाठी, शेतीसाठी, औद्योगिक कामाकरिता व त्यानंतर धार्मिक कारणासाठी पाणी सोडण्यात यावे, असे या धोरणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तरीही राज्य सरकारने दुष्काळी स्थितीत पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसतानाही नाशिकच्या गंगापूर धरणातून कुंभमेळ््यातील शाहीस्नानासाठी पाणी सोडण्याचा आदेश दिला. या आदेशाला नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते एच. एम. देसरडा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.देसरडा यांनी राज्य सरकारची जलयुक्तशिवार योजनाही योग्य पद्धतीने राबवली जात नसल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले. सरकारच्या या योजनेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांनाही हानी पोहचत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने यात आम्ही तज्ज्ञ नसल्याने राज्य सरकारकडे निवेदन करण्याची सूचना याचिकाकर्त्यांना दिले. याचिकाकर्ते म्हणत असतील त्याप्रमाणे खरोखरच वैज्ञानिक पद्धतीने जलशिवार योजना राबवण्यात येत नसेल तर खरोखरच हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी एक समिती नेमावी. दुष्काळमुक्त राज्य निर्माण करण्यासाठी हे आवश्यक आहे, असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)