शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

शिवसेनेशिवाय सरकार!

By admin | Updated: October 21, 2014 04:23 IST

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते विविध पर्यायांवर विचार करीत असून, शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे.

नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते विविध पर्यायांवर विचार करीत असून, शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे. यासंदर्भात सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. काही ‘उद्योगी’ मध्यस्थांनीही याबाबत पुढाकार घेतल्याचे समजते.विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. सरकार स्थापण्यास त्यांना आणखी २२ आमदारांची गरज आहे. मित्रपक्ष रासपकडे १ आमदार आहे. मनसे १, बहुजन विकास आघाडी ३, अपक्ष ७, भारिप-बहुजन महासंघ १ आणि शेकपाचे ३ अशा १५ जणांशी भाजपाने संपर्क साधला असल्याचे सांगण्यात येते. सत्तास्थापनेस आम्ही कोणालाही प्रस्ताव दिलेला नाही. आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असे सूचक विधान भाजपाचे प्रभारी खा. ओमप्रकाश माथूर यांनी केले.नवे सरकार स्थापण्याबाबत पक्षाध्यक्ष शहा यांनी गडकरींसोबत विस्तृत चर्चा केली. गडकरींना मुंबईला पाठवावे असे भाजपश्रेष्ठींना वाटते, मात्र अद्याप गडकरींनी होकार दिलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक निकाल येताच भाजपाला बिनशर्त समर्थन देण्याची घोषणा केली. त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. गंमत म्हणजे भाजपाचा कोणताही नेता राष्ट्रवादीचे समर्थन घेण्याची बाब बोलायला तयार नाही. गडकरी आणि प्रफुल्ल पटेल यांचा कायम संपर्क सुरू असल्याची माहितीही ‘लोकमत’ला मिळाली आहे. राजनाथसिंग आणि जे. पी. नड्डा यांनी सोमवारी आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी मुंबईला जाण्याचे ठरविले होते. त्यांनी दौरा मंगळवारवर ढकलला. दरम्यान, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय भाजपानेच घ्यावा, असे सांगत रा. स्व. संघानेही एकप्रकारे या नव्या राजकीय आघाडीला हिरवा कंदील दिला.