शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तांना शासन घेणार मानधनावर

By admin | Updated: January 8, 2016 03:39 IST

विशिष्ट कामांसाठी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना कंत्राटी पद्धतीने विशिष्ट काळासाठी घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यांना कमाल ४० हजारांपर्यंत मानधन मिळणार

मुंबई : विशिष्ट कामांसाठी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना कंत्राटी पद्धतीने विशिष्ट काळासाठी घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यांना कमाल ४० हजारांपर्यंत मानधन मिळणार असून त्यांसाठी वयोमर्यादा ७० वर्षे असेल.राज्य शासनाच्या काही विभागांत सध्या पदभरती होत नसल्याने विशिष्ट कामांसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मदत घेतल्यास अशा विभागाचे कामकाज सुसह्य होण्यास मदत होऊ शकेल. त्यादृष्टीने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. अशा कर्मचाऱ्यांचे पॅनेल तयार केले जाईल. त्याचा दरवर्षी आढावा घेण्यात येईल. त्यासाठी विविध माध्यमातून प्रसिद्धी देऊन प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. या कामासाठी लागणारी विशेष अर्हता आणि संबंधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. पदे सेवा प्रवेश नियमानुसार भरण्यात येतील, त्यामुळे सरकारमधील नियमति पदभरती प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. विशेष कौशल्य धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी मंजूर पदसंख्येच्या कमाल १० टक्के पदे करार पद्धतीने भरण्यात येतील. करार पद्धतीने नियुक्त्या करण्याचे प्रस्ताव तयार करताना कामाचे स्वरूप, आकस्मिकता, सार्वजनिक हित या बाबी विचारात घेण्यात येणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)निवृत्तीनंतर नियुक्ती देताना कर्मचारी शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे की नाही हे बघितले जाईल. स्वेच्छासेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना संधी दिली जाणार नाही. नेमून दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठीचे हमीपत्र घेण्यात येणार आहे. विभागीय चौकशी सुरू असलेल्यांनादेखील संधी दिली जाणार नाही.एकावेळी एकाच वर्षाचा करार केला जाईल आणि गरज भासल्यास त्याचा कालावधी वाढविला जाईल. नियुक्त प्राधिकाऱ्याला एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्याचा अधिकार असेल. या नियुक्त्यांमुळे सेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर परिणाम होणार नाही.