शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवनासाठी सरकारच पुढाकार घेईल

By admin | Updated: July 21, 2016 04:38 IST

दादर येथील आंबेडकर भवन पाडण्याची कृती अधिकृत नाही. महापालिका, अग्निशमन दल आणि पोलिस खात्याला न कळविता ट्रस्टने भवन पाडण्याची कृती केली.

मुंबई : दादर येथील आंबेडकर भवन पाडण्याची कृती अधिकृत नाही. महापालिका, अग्निशमन दल आणि पोलिस खात्याला न कळविता ट्रस्टने भवन पाडण्याची कृती केली. या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. शिवाय, आंबेडकर भवन उभारणीबाबत प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी एखादा आराखडा दिल्यास सरकारकडून भवन उभारण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दादर येथील आंबेडकर भवनची ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त केल्याच्या घटनेचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. या प्रश्नी डॉ. नीलम गो-हे, जयदेव गायकवाड, जनार्दन चांदूरकर, प्रकाश गजभिये, कपिल पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. पालिकेने आंबेडकर भवनाची वास्तू धोकादायक असल्याची नोटीस बजावल्यानंतर कारवाई करण्यापूर्वी संबंधित ट्रस्टने महापालिका, पोलिस आणि अग्निशमन दलाला कळविण्यास हवे होते. मात्र, अशी कोणतीही खबरदारी ट्रस्टने घेतली नाही. ट्रस्टने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असून सर्व संबंधितांची चौकशी करण्यात येईल. शिवाय, धोकादायक असल्याची नोटीस बजावताना सर्व निकष पाळले गेले का, याची तपासणी केली जाईल. संबंधित पालिका अधिका-यांची चौकशी करु, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. आंबेडकर भवन प्रकरणी आरोपींनी न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळविला आहे. २२ तारखेला या जामीनाची मुदत संपत असून त्यादिवशी सरकार आरोपींच्या पुढील जामीनास विरोध करेल. यासंबंधीची सर्व माहिती न्यायालयात सादर केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. भाजपचा संबंध नाही या प्रश्नावर राजकारण करण्याची आवश्यकता नाही. पालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असली तरी अशा प्रकारचे निर्णय अधिका-यांच्या स्तरावर होतात. महापौर वगैरेंचा तर या निर्णयाशी कसलाच संबंध येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.अधिका-यांवरही कारवाई पालिका आणि खासगी अभियंत्यांनी या वास्तूचे स्ट्रक्चरल आॅडिट करून नोटीस बजावली. मात्र, ही नोटीस योग्य आहे की नाही, स्ट्रक्चरल आॅडीट योग्य केले होते की नाही, वास्तू खरोखरच धोकादायक होती की नाही, हे तपासण्यासाठी अधिका-यांची चौकशी केली जाईल.>बुद्धभूषण प्रेसला हेरिटेज घोषित करणार आंबेडकर भवन पाडताना बुद्धभूषण प्रेसला हात लावण्याचे काहीच कारण नव्हते. बुद्धभूषण प्रेस ही ऐतिहासिक वास्तू असून तिला हेरीटेजचा दर्जा देण्यासाठी पालिकेला शिफारस करू, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. गायकवाड यांच्यावर कारवाईचे संकेतआरोपींमध्ये माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांचेही नाव आहे. मात्र, गाायकवाड सध्या राज्याचे माहिती आयुक्त आहेत. हे पद घटनात्मक आहे.माहिती अधिकाराचा कायदा बनविताना त्या पदास संपूर्णपणे मुक्त ठेवण्यात आले आणि त्यास घटनात्मक संरक्षण दिले गेले. माहिती आयुक्त राज्यपाल नियुक्त असतात. त्यामुळे गायकवाड यांचा या घटनेत नक्की किती सहभाग आहे, याची चौकशी करून त्याचा अहवाल राज्यपालांकडे देण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.