शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

घोषणांचा पाऊस, स्वप्नांची मालिका दाखविणारे सरकार

By admin | Updated: February 13, 2016 02:34 IST

बुलडाणा येथे विखे पाटील यांची भाजपा सरकारवर टीका.

बुलडाणा : भाजपाचे सरकार हे शेतकर्‍यांच्या प्रती संवेदनशील नाही. त्यांना शेतकर्‍यांशी काहीही घेणे-देणे नाही. केवळ घोषणांचा पाऊस अन् स्वप्नांची मालिका दाखविणारे हे सरकार असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ना. विखे पाटील शुक्रवारी बुलडाण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या सरकारच्या सर्व घोषणा या पोकळ आहेत. मंत्र्यांमध्ये वर्चस्व व नेतृत्वाची स्पर्धा लागली आहे. आधी घोषणा करायची, मग चिंतन करायचे, असा सर्व उरफाटा कारभार सुरू असल्याने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. पाणी टंचाईच्या झळा जोरात बसत असून, आमच्या सरकारने टँकरसाठी तहसील स्तरावर अधिकार दिले होते. आता या सरकारने विभागीय स्तरावर अधिकार दिल्याने टँकरच्या मंजुरीसाठी ग्रामस्थांना हेलपाटे घ्यावे लागत आहेत. सत्ताधार्‍यांचा समाचार घेताना ते म्हणाले की, सध्या एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी अंतर्गत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची त्यांनी भेट घेतली. या सरकारमध्ये शिवसेनेचे अस्तित्व जाणवत नसून, ते केवळ भाजपमागे फरफटत जात आहे. देशासमोर अनेक आव्हाने, संकटे उभी असताना सरकार डिजिटल इंडिया, मेक इन इंडियासारख्या योजनेत गुंतून पडले आहेत. राज्य शासनाची दशाही सारखीच असून, भीषण दुष्काळ, टंचाई, नापिकी, शेतकरी आत्महत्या, मदत, पुनर्वसन या सर्वच पातळ्यांवर संवेदनहीन राज्य शासन अपयशी ठरले आहे. दुष्काळ निधी वाटपात कापूस उत्पादकांना वगळले व नंतर काल-परवा त्यांनाही मदत करू, अशी पोकळ घोषणा केली. दुष्काळी भागातील प्रामुख्याने मराठवाड्यातून मोठय़ा प्रमाणावर होणारे स्थलांतरण, मनरेगा व रोहयोची कामे सुरू करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात राज्य शासन कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला.