शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत सरकारची चालढकल

By admin | Updated: May 4, 2017 04:14 IST

मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढल्यानंतरही, सरकार आरक्षण देण्याबाबत चालढकल करत असल्याचा आरोप

मुंबई : मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढल्यानंतरही, सरकार आरक्षण देण्याबाबत चालढकल करत असल्याचा आरोप राष्ट्रीय मराठा पार्टीने केला आहे. त्यामुळे सरकारला धडा शिकवण्यासाठी यंदाच्या पनवेल निवडणुकीत ५० ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा पार्टीने मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.पार्टीचे अध्यक्ष अंकुश पाटील म्हणाले, ‘केंद्र व राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशावर विश्वास आहे. मात्र, सरकार मराठा आरक्षणाची बाजू ठामपणे मांडताना दिसत नाही. केवळ चालढकल करून वेळकाढूपणा सुरू असल्याचे दिसते. अ‍ॅट्रोसिटी कायद्यात बदल करण्याची मागणीही समाजाने केली होती. मात्र, सरकारने अ‍ॅट्रोसिटी कायदा अधिक कडक करत, मराठा समाजाला दुखावले आहे. एकीकडे राज्यात तूर खरेदी थांबल्याने व कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येवाचून पर्याय नाही. परिणामी, सरकारला धक्का देण्यासाठी पनवेल महापालिकेपासून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय पार्टीने घेतला आहे.’ भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पाडण्यासाठी पार्टीने चार उमेदवारांची यादीही या वेळी जाहीर केली. लवकरच उरलेल्या ४६ उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)