शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या भावना सरकारने समजून घ्याव्यात : तटकरे

By admin | Updated: September 20, 2016 19:20 IST

मराठा समाजाचे राज्यभर जे मोर्चे निघत आहेत, ते शांततापूर्ण मार्गाने निघत आहेत. लोकशाहीत शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा सार्वांना अधिकार आहे

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. २० : मराठा समाजाचे राज्यभर जे मोर्चे निघत आहेत, ते शांततापूर्ण मार्गाने निघत आहेत. लोकशाहीत शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा सार्वांना अधिकार आहे. मराठा समाजाच्या भावना सरकारने समजून घेणे गरजेचे आहे, असे व्यक्तव्य राष्ट्रवादी कॉग्रसेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे पंढरपूर येथे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंगळवारी सकाळी येथे आले होते. या वेळी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. पुढे तटकरी म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला विरोध आजपर्यंत विरोध करण्याचे काम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याची आमची इच्छा होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे आघाडी झाली नाही.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी आघाडी करण्याच्या चर्चा सुरू होत्या, तेंव्हा ते कराडला निघून गेले होते. २७ सप्टेंबर २०१४ रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे उमेदवारांची यादी आम्ही नाईलाजाने २५ सप्टेंबर रोजी जाहीर केल्या होत्या. आता मात्र आघाडी तोडल्याचे खापर राष्ट्रवादीवर फोडले जाते हे चुकीचे आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ राष्ट्रवादीला विरोध करण्याचे काम केले आहे अशी टीका तटकरे यांनी केली

अच्छे दिन कुठे गेले राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी केली. ते पंढरपूर मध्ये बोलत होते. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. राज्यात पोलिसांवर हल्ले होत आहे. सरकारचा धाक कमी झाला असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून ह्यअच्छे दिन कुठे गेलेह्ण असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला.

चव्हाणांना तटकरेंचा टोलाकॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला टार्गेट केले होते. या बाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि , मागे एकदा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते कि मी जर कारवाई केली असती तर तीन माजी मुख्यमंत्र्यांवर कारवाई करावी लागली असती या मध्ये आमचा पक्ष संपला असता असे वक्तव्य केले होते. याची आठवण त्यांनी ठेवावी असा टोला तटकरे यांनी चव्हाण यांना लगावला.

आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरुविधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नियोजन विस्कळीत झाले होते. परंतु येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी आम्ही धोरण ठरवले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानरगापलिका, नगरपालिका निवडणुकीच काम सुरु आहे