शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी शासनाने वटहुकूम काढावा

By admin | Updated: July 5, 2015 02:08 IST

सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी राज्य सरकारने आता थेट वटहुकूम काढावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी राज्य सरकारने आता थेट वटहुकूम काढावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या मागणीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील पाठिंबा दर्शविला आहे. ते याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यामुळे फडणवीस सरकार न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार की मंडळांचे मन राखण्यासाठी न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसविणार; याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे मंडळांना पाठिंंबा देत शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सवादरम्यान विविध परवान्यांसाठी महापालिकेचे आणि इतर प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. यावर तोडगा काढण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने शनिवारी सायंकाळी ६ वाजता दादरमधील शिवसेनाभवनात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची खंत व्यक्त केली. राज्यात पूर्वीच्या युती सरकारने वटहुकूम काढत सार्वजनिक मंडळांना दिलासा दिला होता. ही बाब समितीने उद्धव यांच्या लक्षात आणून दिली. यावर गणेशोत्सवादरम्यान वटहुकूम काढण्यात यावा म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तसे आश्वासनच त्यांनी समितीला दिले आहे. (प्रतिनिधी)मुंबईतील गणपती, नवरात्र आणि दहीकाला उत्सव साजरे करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे उत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत भाजपाने महामंत्री सुनील राणे, आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक जनाधिकार समिती गठित केली आहे. या समितीच्या वतीने शुक्रवारी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. यावर ९ जुलै रोजी सुनावणी होईल.