शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

सरकारने कर्जमाफी द्यावी अथवा शेतमालाला किंमत मिळवून द्यावी- शरद पवार

By admin | Updated: May 28, 2017 22:45 IST

सरकारने कर्जमाफी द्यावी अथवा शेतमालाला किंमत मिळवून द्यावी, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 28 - सरकारने कर्जमाफी द्यावी अथवा शेतमालाला किंमत मिळवून द्यावी, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. संसदीय कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.  ते म्हणाले, शेतकरी हिताचे निर्णय व्हावेत यासाठी सामूहिक शक्ती निर्माण करावी, मतभेद विसरून एकत्र यावे, तर शेतक-याला न्याय मिळेल, बळीराजाचे हित जपण्यासाठी जागे राहिले पाहिजे. एकतर शेतमालाला किंमत द्या नाही तर कर्जमाफी द्या, महाराष्ट्राचा अन् देशाचा बळीराजा उद्ध्वस्त झाला तर देश मजबूत होणार नाही, शेतकरी हे राज्य अन् देश चालवत आला आहे, असंही पवार म्हणाले आहेत.महाविद्यालयीन जीवनात महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाच्या नेतृत्वाचे स्वप्न बघितले नाही, मात्र यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श माझ्यासमोर होता. त्यांच्या उद्याच्या महाराष्ट्राची भूमिका मला भावली. महाराष्ट्राने मला भरभरून दिले, मात्र त्यातही नाशिककरांचा मोठा वाटा आहे. देशाच्या संसदेत महाराष्ट्राची संख्या वाढू शकलो नाही, हे मान्य करतो.  वास्तवतेचे भान ठेवून राजकीय वाटचाल करण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीच पाय जमिनीवर ठेवणे पसंत केले. सोन्याच्या साखळ्या अन् अंगठ्या घालणाऱ्या पुढा-यांपासून मी नेहमीच लांब राहतो. मुंबईचे डबेवाले हे जास्त करून नाशिकचे, हे नाशिकचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील कर्तृत्ववान माणसं माझी आहेत, त्यांचा मला अभिमान वाटतो.

खेळाडू आणि त्यांच्या सुविधा ही माझी जबाबदारी मी मानली. मुंबई क्रिकेट क्लबला कर्जमुक्त करून मी पद सोडले. ब्रॅडमन यांच्या विक्रमापेक्षा भाऊसाहेब निंबाळकर यांनी केवळ तीन धावा कमी काढल्या. त्यांना 50 हजार रुपये पेन्शन सुरू केली. जुन्या खेळाडूंना प्रतिष्ठा व सन्मान मिळवून दिला. भारतीय क्रिकेट क्लबने 50 कोटी भारतीय खेळांच्या विकासासाठी खेळ मंत्रालयाकडे दिले. लातूरचा भूकंप हा मोठा धक्का, त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो, झोप सोडली, पहाटे निघालो, सकाळी किल्लारी लातूरला गाठले, अंत्यसंस्कार अडचणीत आले, मुसळधार पाऊस सुरू झाला होता, तो काळ मोठा आव्हानात्मक होता. त्यावेळी पाच हजार माणसे त्या जिल्ह्यात मृत्युमुखी पडली होती. ते आठवले तरी अंगावर शहारा येतो. मुख्यमंत्री असताना 1993 साली एअर इंडियाच्या इमारतीत बॉम्ब फुटला. त्यावेळी मी तेथे पोहोचलो, आरडीएक्स देशात पुण्याच्या खडकीमध्ये तयार होते, आरडीएक्स कराचीतून आल्याचे लक्षात आले, त्यावेळी 12 ठिकाणी बॉम्ब पडले असे सांगितले. 12वे ठिकाण मुहम्मदअली रोडचे होते, दंगल टळली, 11 ठिकाणी बॉम्ब पडले होते. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता येत नाही हा आपला पराभव आहे असे मानले, तीन वर्षांनंतर मी आंबेडकर यांचे नाव दिले, असंही पवार यांनी सांगितलं आहे.