शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शासन दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका

By admin | Updated: December 23, 2015 01:31 IST

फी आकारणी संदर्भातील नियमावली गेले चार वर्षे राज्य सरकार बनवू न शकल्याने त्याचा थेट फटका आता विद्यार्थ्यांना बसणार आहे.

मुंबई : फी आकारणी संदर्भातील नियमावली गेले चार वर्षे राज्य सरकार बनवू न शकल्याने त्याचा थेट फटका आता विद्यार्थ्यांना बसणार आहे. आंतरराष्ट्रीय, विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ टक्के वाढीव फीचा बोजा सहन करावा लागणार आहे. उच्च न्यायालयाने शैक्षणिक वर्ष २०१६-१७साठी या शाळांना १५ टक्के फी वाढ करण्यास मुभा दिली.पालकांकडून बेसुमार शुल्क आकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय, विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांना चाप बसावा, यासाठी सरकारने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण कायदा २०११मध्ये तयार केला. मात्र या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेली नियमावली गेली चार वर्षे अस्तित्वात आणण्यास सरकारला अपयश आले. नियमावली अभावी या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिल्याने ‘द असोसिएशन आॅफम इंटरनॅशनल स्कूल्स इन इंडिया’ आणि ‘अनएडेड स्कूल्स फोरम’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.याचिकेनुसार राज्य सरकारकडून शाळांना कोणत्याही प्रकारचे साहाय्य नसल्याने हा कायदा आंतरराष्ट्रीय, विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांना लागू होऊ शकत नाही, असे म्हणणे मांडले. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मुळातच या समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. सगळा कारभार अर्धवट असतानाही राज्य सरकार हा कायदा शिक्षण संस्थांवर लादू शकत नसल्याचे म्हटले.त्यावर सरकारी वकील जी.डब्ल्यू. मॅट्टोस यांनी सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. आगामी अधिवेशनात नियमावली मंजुरीसाठी ठेवली जाईल, असे न्या. अनुप मोहता व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाला सांगितले. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे नियमावलीच तयार नाही. त्याशिवाय राज्यातील आठ विभागीय समित्यांच्या सदस्यांचीही नियुक्ती केलेली नाही, असे असतानाही सरकार कायद्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह करत आहे. सगळे अर्धवट असताना कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय, विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांना २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी वाढ करू द्या, असे म्हणत खंडपीठाने या शाळांना फी वाढ करण्याचा मार्ग मोकळा केला. या याचिकेवरील पुढील सुनावणी १८ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)