शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बुडालेल्या लॉटरी महसूल वसुलीबाबत सरकार गंभीर

By admin | Updated: July 26, 2016 02:39 IST

परराज्यातील आॅनलाईन लॉटऱ्यांनी बुडविलेला महसूल वसूल करण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुंबई : परराज्यातील आॅनलाईन लॉटऱ्यांनी बुडविलेला महसूल वसूल करण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लॉटऱ्यांमुळे बुडालेल्या महसूलाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील जुगार, मटका, अवैध व्यापार बंद व्हावेत, या उद्देशाने १९७२ साली राज्यात लॉटरी सुरू करण्यात आली. तर, १९९८ साली केंद्र सरकारने लॉटरीबाबत कायदा केला. त्यामुळे राज्यात परराज्यातील आॅनलाईन लॉटरीला परवानगी देण्यात आली. केंद्राच्या नियमानुसारच राज्यात आॅनलाईन लॉटरी सुरु असून त्या वैध आहेत. लॉटरी धारकांकडील महसूल थकाबाकीसंदर्भात अलीकडेच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागासोबत बैठक झाली. त्याच्या तपासासाठी विभागाला दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यातील काही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून या प्रकरणी लवाद नेमण्याची विनंती सर्वोच्च न्यायालायाला केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्याच्या महसुलाच्यादृष्टीने पै-पै महत्त्वाची असल्यामुळे यासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लॉटरीच्या महसुलातून यावर्षी राज्याला १११ कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून त्यावर सुमारे एक लाख ५० हजार लोकांचा रोजगार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)‘आॅनलाईन’ची बैठक झालीराज्याची स्वत:ची आॅनलाईन लॉटरी सुरू करण्याबाबत राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी ५ जुलैला बैठक घेतली आहे.तांत्रिक, कायदेशीर व सामाजिक बाबींचा तपास करण्याचे निर्देश दिल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. नारायण राणे, भाई जगताप, हेमंत टकले, नीलम गोऱ्हे यांनी उपप्रश्न उपस्थित केले.