शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांहून सरकारी शाळा सरस

By admin | Updated: January 19, 2017 06:20 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्र चांगले असल्याचे ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात समोर आले

मुंबई : खासगी शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळते, असा समज असला तरी प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती ही खासगी शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगली असल्याचे चित्र ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात समोर आले आहे. राज्यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ‘प्रथम’ संस्थेने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा ‘असर’ अहवाल बुधवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. २०१६मध्ये केलेल्या या सर्वेक्षणात राज्यातील ३ ते १६ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला होता. ५ ते १६ वयोगटातील मुलांची वाचन आणि गणिताची चाचणी घेण्यात आली. त्यात खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तुलनेत चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्हा परिषदेतील शाळांतील इयत्ता तिसरीच्या ४१.२ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तरावरचा मजकूर वाचता आला. तर, खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या तिसरीच्या फक्त ३८.८ टक्के विद्यार्थ्यांनाच दुसरीचा मजकूर वाचता आल्याचे या अहवालात म्हटले आहे. जिल्हा परिषदेतील शाळांतील इयत्ता पाचवीचे ५१.७ टक्के विद्यार्थी २०१४ मध्ये इयत्ता दुसरीच्या क्षमतेचा परिच्छेद वाचू शकत होते. हे प्रमाण २०१६मध्ये ११ टक्क्यांनी वाढून ६२.७ टक्के इतके झाले आहे. राज्यातील ५ वर्षांखालील ९५ टक्के बालके ही बालवाडी, अंगणवाडी व प्राथमिक शाळेत दाखल झाली आहेत. गेल्या १० वर्षांत खासगी शाळांमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ६ ते १४ वयोगटातील मुलांचे खासगी शाळांत प्रवेश घेण्याचे प्रमाण २००६ मध्ये १८.३ टक्के इतके होते. तर, २०१६ मध्ये हे प्रमाण ३८.३ टक्के इतके झाले आहे. पण, प्राथमिक स्तरावरील शिक्षण हे खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांत चांगले मिळत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. राज्यात इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या आणि अक्षरे व त्यापेक्षा अधिक वाचू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ६०.७ टक्के आहे. तर देशात हे प्रमाण ५३.९ टक्के इतके आहे. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गणित सोडवण्याची क्षमता २०१४च्या तुलनेत वाढली आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांना भागाकाराचे गणित (तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे) सोडवण्याचे प्रमाण २०१४मध्ये १८.९ टक्के होते. २०१६मध्ये हे प्रमाण २०.३ टक्क्यांवर पोहचले आहे. राज्यातील प्राथमिक शाळांची परिस्थिती चांगली असली तरी माध्यमिक शाळांची परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नसल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. राज्यातील इयत्ता आठवीच्या २४.२ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचा मजकूर वाचता आलेला नाही. देशाच्या तुलनेत राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांची आणि शिक्षकांची उपस्थिती अधिक आहे. इयत्ता पहिले ते चौथी-पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सरासरी उपस्थिती ८५.१ टक्के एवढी आहे. तर, देशातील शाळांमध्ये उपस्थितीचे प्रमाण ७१.४ टक्के आहे. ज्या दिवशी सर्वेक्षण केले, त्या दिवशी पहिली ते चौथी-पाचवीच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ९१.८ टक्के होती. तर, देशातील अन्य शाळांतील उपस्थिती ही ८५.४ टक्के होती. (प्रतिनिधी) >शाळांच्या सुविधेत वाढ मुलींकरिता स्वतंत्र व स्वच्छ शौचालयाचे प्रमाण २०१०मध्ये 43.2%इतके होते. त्यात वाढ होऊन प्रमाण २०१६मध्ये 62.5% इतके झाले>शाळा भेटीच्या दिवशी २०१० मध्ये 99.7% शाळेत माध्यान्ह भोजन दिले जात होते. २०१६ मध्ये हे प्रमाण 94.5%इतके झाले आहे.