शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सरकार ‘संघ दक्ष’; मात्र ‘कर्तव्यदक्ष’ नाही!

By admin | Updated: January 10, 2016 01:06 IST

पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरासाठी सरकार सर्वार्थाने कामाला लागल्याचे दिसून येत होते. परंतु, याच पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी झटताना दिसून

मुंबई : पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरासाठी सरकार सर्वार्थाने कामाला लागल्याचे दिसून येत होते. परंतु, याच पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी झटताना दिसून येत नाही. हे सरकार ‘संघ दक्ष’ आहे; मात्र ‘कर्तव्यदक्ष’ नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे आमदार अमरीश पटेल, भाई जगताप आणि सतेज पाटील यांचा टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला. या कार्यक्र मात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणकिराव ठाकरे, खा. हुसैन दलवाई, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.बिहार, मध्य प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकींचे निकाल भाजपसाठी प्रतिकूल आहेत. दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे जनतेत भाजपविरोधी वातावरण आहे. या वातावरणाचा लाभ घ्यायचा असेल तर लोकांमध्ये जाऊन या सरकारची वस्तुस्थिती लोकांसमोर उघड करा. मागील वर्षभरात महाराष्ट्र कसा अधोगतीकडे गेला, हे लोकांच्या निदर्शनास आणून द्या. ही जबाबदारी व्यविस्थतपणे पार पाडली तर ‘अच्छे दिन’ आणण्याचे खरी ताकद भाजपमध्ये नव्हे तर काँग्रेसमध्येच असल्याची जनभावना निर्माण होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)परंतु काँग्रेस पक्ष आक्र मकपणे सरकारविरूद्ध संघर्ष करीत राहील. तीनही सत्कारमूर्ती अमरीश पटेल, भाई जगताप व सतेज पाटील यांनी देखील सत्काराला उत्तर म्हणून मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माचे संचालन प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील यांनी केले.