मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी ३ आॅगस्टला भायखळ््यातील राणी बागेपासून आझाद मैदानापर्यंत पुकारलेल्या धडक मोर्चाला पोलिसांनी रविवारी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी समाज भावनांचा उद्रेक झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.राणे म्हणाले, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मात्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसताना सुरक्षाही देऊ शकत नाही. परिणामी होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठा समाजाने कायदा हाती घेतल्यास त्यास सरकार सर्वस्वी जबाबदार असेल. ३ आॅगस्टला काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या परवानगीसाठी रितसर अर्ज केला होता. राजकारण बाजूला ठेवत मराठा समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या सुमारे ३५ हून अधिक संघटना या मोर्चात सामील होणार होत्या.मोर्चा काढण्यास सरकारने परवानगी दिलेली नसली, तरी याप्रकरणी विधानसभेत आवाज उठवू, असेही त्यांनी सांगितले. तर इतर संघटना आणि कार्यकर्ते विधानसभेबाहेर आवाज उठतील, असा सूचक इशाराही राणे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
समाजाचा उद्रेक झाल्यास सरकार जबाबदार-नीतेश राणे
By admin | Updated: August 2, 2016 05:34 IST