शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
3
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
4
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
5
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
6
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
7
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
8
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
9
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
10
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
11
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
12
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
13
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
14
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
15
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
16
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
17
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
18
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
19
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
20
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!

आंबेडकर भवन पाडण्यास सरकार जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 05:08 IST

आंबेडकर भवन रातोरात पाडण्यात माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी सदस्यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला.

मुंबई : दादर येथील आंबेडकर भवन रातोरात पाडण्यात माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी सदस्यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला. दादर येथील आंबेडकर भवन पाडण्यात आल्याच्या मुद्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांनी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला होता. यावेळी झालेल्या भाषणात जयदेव गायकवाड, जनार्दन चांदूरकर, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, कपिल पाटील, हरिभाऊ राठोड आदी सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच आंबेडकर भवन पाडण्यात आली. तसेच ही इमारत धोकादायक ठरविणारी मुंबई महापालिकाही तितकीच जबाबदार असल्याचे गायकवाड म्हणाले. तर, आंबेडकर भवन ऐतिहासिक वास्तू होती. तिथे मुकनायक, प्रबुद्ध भारत आदी वृत्तपत्रे छापली जात. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय अशी ऐतिहासिक वास्तू पाडता येत नाही. राज्याचे माजी मुख्यसचिव आणि सध्याचे माहिती लोकायुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या पाठीमागे अदृश्य राजकीय शक्त कार्यरत आहे. त्यामुळे आंबेडकर भवन पाडण्याचे षडयंत्र रचण्यात आले, असा आरोप चांदूरकर यांनी केला. या प्रश्नावरुन आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे सभागृहाचे नियमित कामकाज बाजूला सारुन या विषयावर चर्चा घेण्याची मागणी विरोधकांनी केली. मंगळवारच्या दिवसभराच्या कामकाजात याच विषयावरील लक्षवेधी सूचना मांडण्यात आली असल्याचे सांगत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्थगन प्रस्ताव नाकारला. (प्रतिनिधी)>आंबेडकर भवनप्रकरणी चौकशीचे निर्देशडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादर येथे उभारलेले भवन धोकादायक ठरवून ते पाडण्याची परवानगी कोणी दिली, नव्या इमारतीचा आरखडा कोणी मंजूर केला आणि इंटेनशन फॉर डेव्हलपमेंटला परवानगी कशी मिळाली, याची त्वरित चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले. विधानसभेत हा विषय बळीराम शिरसकर यांनी अनोख्या पध्दतीने उपस्थित केला. तर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार आणि आमदार भाई गिरकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतचे निवेदन दिले. शेलार म्हणाले, डॉ. आंबेडकर यांच्या सर्व वास्तुंचे जनतच झाले पाहिजे अशीच भूमिका सरकार आणि भाजपाची आहे. दादर येथील या पवित्र वास्तूलाही ऐतिहासिक वारसा वास्तू म्हणून घोषित करून महापालिकेने जतन करण्याची गरज होती. पण संपूर्ण वास्तुला ३५४ ची नोटीस बजावून ती धोकादायक इमारतीच्या सी १ दर्जामध्ये टाकण्यात आली. तसेच नव्या इमातीचा आराखडा मंजूर करण्यात आला.