शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा सरकारी अहवाल खोटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 04:33 IST

मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा सरकारीं अधिकाºयांनी सादर केलेला सरकारी अहवाल खोटा

रुचिका पालोदकर  औरंगाबाद : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा सरकारीं अधिकाºयांनी सादर केलेला सरकारी अहवाल खोटा असल्याची धक्कादायक माहिती सोमवारी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्यासमोरच उघड झाली. त्यामुळे संबंधित कुटुंबांचे सर्वेक्षण पुन्हा एकदा ४ एप्रिलला करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.महाराष्ट्र राज्य महिला आयोग, महिला किसान अधिकार मंच (मकाम) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विभागीय आयुक्तालय यांच्या सहकार्याने सोमवारी ‘मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकºयांचे प्रश्न’ या विषयावर दोन दिवसी चर्चासत्र सुरू झाले.१५ नोव्हेंबर २०१७ रोजी विभागीय आयुक्तालयातर्फे मराठवाड्यातील ४०० अधिकाºयांना आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. आपल्याकडे कोणी अधिकारी आले होते का?, असे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी विचारले. त्यावर १५० महिलांपैकी तीन-चार महिलांनीच हात वर केला. त्यामुळे सरकारी अधिकाºयांचा ढिसाळपणा आयुक्तांच्या लक्षात आला. आता ४ एप्रिलला अधिकारी पुन्हा सर्वेक्षण करतील, कुटुंबाच्या अडचणी सोडविण्यासाठी एकेक कुटुंब दत्तक घेतील, असे आश्वासन त्यांनी दिले.महिलांसाठी तालुकास्तरावर वारसाहक्क नोंदणी शिबिरांचे आयोजन करावे, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी विभागीय आयुक्तांना सुचविले.