शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा रीमोट माझ्याच हाती !

By admin | Updated: January 24, 2016 02:46 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचा रीमोट कंट्रोल उद्धव ठाकरे यांच्या हातात आला. मात्र आज अनेक कामांच्या योजनांचा शुभारंभ करताना उद्धव यांनी रीमोट

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचा रीमोट कंट्रोल उद्धव ठाकरे यांच्या हातात आला. मात्र आज अनेक कामांच्या योजनांचा शुभारंभ करताना उद्धव यांनी रीमोट माझ्या हातात दिला. त्यामुळे युती सरकार चालवण्याचा रीमोट कंट्रोल माझ्या हातात आहे आणि सरकार चालविण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे आम्हाला सहकार्य करा, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच शिवसेनेला लगावला. काहीही झाले तरी महाराष्ट्रात कामाच्या जोरावर ‘शिवशाही’च पाच वर्षे कायम दिसेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आठ योजनांची सुरुवात शनिवारी रीमोटद्वारे करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते, आरोग्यमंत्री दीपक सावंत, खा. अनिल देसाई, अरविंद सावंत, एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी एसटी महाराष्ट्राची जीवनवाहिनीअसून, शेवटपर्यंत वाट पाहणाऱ्या माणसालाही एसटीचा आधार वाटतो, असे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, २४ तास तुम्ही महाराष्ट्राला सेवा देता हे कोणी विसरू शकत नाही.तत्पूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले की,बऱ्याच वर्षांनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद पाहायला मिळत आहे. सरकार बदलले ही चुणूक तुमच्यामुळेच दिसून आली. एसटीचे कर्मचारी कोणत्या परिस्थितीत काम करतात, त्याची कोणी दखल घेतली नाही. आधीच्या सरकारने तर अजिबात घेतली नाही. त्यामुळे आताच्या सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. यावेळी त्यांनी शिवशाही बस सेवेचा उल्लेख करत बसवर फडकलेला भगवा गावोगावी पोहोचविण्याचे आवाहन केले. महामंडळाच्या योजना तर लोकाभिमुख आहेतच. पण प्रत्यक्षात कामच बोलत असल्याने आपल्याला अधिक बोलण्याची गरज लागत नाही, असे ते म्हणाले. पै-पैचा वापर...एसटी कर्मचाऱ्यांतर्फे एक दिवसाच्या वेतनाची एकूण ६ कोटी २६ लाख ३१ हजार ४८९ रुपये एवढी रक्कम दुष्काळनिधीसाठी देण्यात आली. तुम्ही दिलेली पै आणि पै शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरली जाईल, असा विश्वास त्यांनी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांना दिला.शिवशाहीवरून कोपरखळी...शिवशाही बससेवेचा उल्लेख करत, मुख्यमंत्री म्हणाले, ‘सरकारी काम हे पूर्वी ठोकळ्यासारखे होते. आता तसे राहिले नाही. हे शिवशाही बसमधूनच दिसून आले. आपण शिवशाहीत प्रवेश करतोय हे बसमध्ये प्रवेश करताच समजते.’