शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत शासन उदासीन - खासदार वनगा

By admin | Updated: July 1, 2016 03:49 IST

आदिवासींमध्ये आता शिक्षणाची आवड निर्माण होत असून विद्यार्थी जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

तलासरी : आदिवासींमध्ये आता शिक्षणाची आवड निर्माण होत असून विद्यार्थी जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु शासनाकडून शिक्षणाच्या सवलती आदिवासी भागात उपलब्ध केल्या जात नसल्याने त्यांना शिक्षण सोडावे लागत आहे. आदिवासीभागातील शिक्षण प्रसाराबाबत शासनच उदासीन आहे असा आरोप खासदार चिंतामण वनगा यांनी केला आहे.तलासरी तालुक्यात इयत्ता आठवी व नववी विद्यार्थी प्रवेशाची समस्या अत्यंत गंभीर असून तुकडयाना मान्यता मिळत नसल्याने प्रवेशा अभावी शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून बाल मजुरी कडे वळावे लागते. तुकडया मान्यतेचे प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहेत. प्रवेश मिळत नसल्याने पालकासह विद्यार्थ्यांनी वनगा यांची भेट घेतली यावेळी शाळांची पाहणी केली असता तुकडया नसल्याने एकेका तुकडीत दोनशे विद्यार्थी बसलेले आढळून आले.आठवी प्रवेशाची समस्या गंभीर असल्याने जिल्हा परिषदेच्या दहा शाळामध्ये आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. परंतु, आठवी नंतर नववीच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला असून जिल्हा परिषदेच्या शाळातील चारशे तेहतीस विद्यार्थी नववी प्रवेशासाठी वणवण फिरत आहेत. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून शाळा संस्थाच्या नावे पत्रे दिली जात आहेत, परंतु आधीच आठवी नववीचे वर्ग तुडुंब भरलेले त्यात नववीच्या जादा विद्यार्थ्यांना प्रवेश कसा द्यायचा असा प्रश्न आहे. (वार्ताहर)सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणीही वंचित राहणार नाही.- राहुल धूम, बीडीओ, पंचायत समिती, तलासरी प्रवेश सर्वांना देण्यात आला आहे. तरीही कोणी बाकी असेल तर शिक्षण विभागाशी संपर्क साधावा प्रवेश मिळवून देण्यात येईल - के. बी. सुतार, गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती, तलासरी