शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

सरकार एक पक्षकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 04:56 IST

न्यायालयीन परीक्षण हा आपल्या राज्यघटनेचा गाभा आहे आणि सरकारी छोट्यामोठ्या निर्णयाला न्यायालयात आव्हान ही नित्याची बाब झाली आहे. त्याला अंत नाही.

-  अॅड. नितीन देशपांडे न्यायालयीन परीक्षण हा आपल्या राज्यघटनेचा गाभा आहे आणि सरकारी छोट्यामोठ्या निर्णयाला न्यायालयात आव्हान ही नित्याची बाब झाली आहे. त्याला अंत नाही.ज्या खटल्यांमध्ये साक्षीपुरावे घेऊन आपले गाºहाणे सिद्ध करावे लागते, अशा खटल्यात उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करता येत नाही. दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो. दिवाणी दंड सहितेत १८७०पासून कलम ८०ची योजना करण्यात आली. त्यानुसार नागरिकांना सरकारविरुद्ध दावा करण्यापूर्वी सरकारला आपण काय दावा दाखल करणार आहोत याची पूर्व नोटीस देणे आवश्यक केले. त्याचा हेतू असा आहे की नागरिकांचे गाºहाणे सरकार समजावून घेईल आणि जर त्यात तथ्य आढळले तर प्रस्तावित वादीचे गाºहाणे दूर करील. अशाने न्यायालयीन खटले निदान सरकारपुरते तरी कमी होतील.पण विधि आयोगाच्या १२६व्या रिपोर्टनुसार कलम ८० खाली नोटीस दिल्यास सरकारी अधिकारी घाईने पावले उचलून वादीच्या गाºहाण्यावर पाणी कसे पडेल असे बघत. म्हणून अशी नोटीस न देता दावा दाखल करून मनाईचा हुकू म घेऊन मगच नोटीस देण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. या कलमाच्या घटनात्मक वैधतेला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दिलेले आव्हान फेटाळले गेले.या कलमाच्या मूळ हेतूलाच सरकार पक्षाकडून काळे फासले गेलेले आहे. एकदा कलम ८०ची नोटीस दिलेली व्यक्ती मृत झाली. तिच्या मुलाबाळांनी लावलेल्या दाव्यावर सरकारने तांत्रिक हरकत घेतली. यावर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सदरहू नोटिसीवर दाखल केलेला दावा योग्य ठरवला. कलम ८०च्या नोटिसीवर ढिम्म राहून सरकार पक्षानेच न्यायालयीन प्रकरणाच्या संख्येवर आळा घालण्याची संधी घालवली आणि ती एक औपचारिकता बनली. नागरिक ांनी कायदे पाळावेत असा आग्रह धरणारे सरकार अशा नोटिसीवर कोणतीच कारवाई न करून स्वत: कायदे तोडते. म्हणून विधि आयोगाने आपल्या १४व्या अहवालात हे कलमच रद्द करण्याची शिफारस केली. त्याची दखलही सर्वोच्च न्यायालयाने घेतली. त्यानंतर आपल्या २७व्या अहवालात पण आयोगाने हेच मत व्यक्त केले. पण संसदेच्या संयुक्त समितीने ही शिफारस अमान्य केली. यामुळे जगात कोठेही नसणारे हे बंधन कारणाशिवाय तसेच चालू आहे. या नोटिसीमुळे सरकार खटले टाळण्यासाठी काहीही करत नाही. मग खटल्यांची संख्या वाढली तर दोष कुणाचा?

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या