शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलणार?

By admin | Updated: January 12, 2016 01:59 IST

पनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती सोमवारी सरकारने उच्च न्यायालयाला दिली. सरकारी कार्यालयीन कामाकाजाच्या

मुंबई : उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती सोमवारी सरकारने उच्च न्यायालयाला दिली. सरकारी कार्यालयीन कामाकाजाच्या वेळा अर्धा तास पुढे-मागे होण्याची शक्यता आहे, अशीही माहिती सरकारने उच्च न्यायालयाला दिली. महिलांच्या संरक्षणासंदर्भात आणि त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याबाबत तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी डब्बा आरक्षित ठेवण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. यापूर्वीच्या सुनावणीवेळी खंडपीठाने राज्य सरकारला उपनगरी रेल्वेसेवेवरील ताण कमी करण्यासाठी तसेच त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांचा कामकाजाच्या वेळा बदलण्याची सूचना केली होती. सोमवारच्या सुनावणीवेळी सरकारी वकील पी. पी. काकडे यांनी खंडपीठाने केलेल्या सूचनेवर प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे शक्य आहे आणि सरकार यावर गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती खंडपीठाला दिली. अर्धा तास वेळ पुढे- मागे करण्यात येईल. यासंदर्भातील प्रस्ताव सर्व विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवण्यात आला आहे आणि त्यांना यावर सूचना देण्यास सांगितले आहे, असे अ‍ॅड. काकडे यांनी सांगितले. महिलांसाठी स्वच्छतागृहे आणि अन्य प्रवाशांसाठी स्वच्छ पाण्यासंदर्भात आम्ही वारंवार रेल्वे प्रशासनाला यासंदर्भात काहीतरी करा, असे सांगत आहोत, मात्र आतापर्यंत आम्हाला काहीही करून दाखवण्यात आलेले नाही. केवळ चर्चा केली जाते पण कृती शून्य. प्रवाशांना केवळ स्वच्छ शौचालये आणि पाणी हवे आहे, असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २२ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली. (प्रतिनिधी)