शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
3
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
4
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
5
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
6
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
7
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
8
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
9
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
10
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
13
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
14
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
15
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
16
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
17
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
18
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
19
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
20
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात

डेंग्यू रुग्णांची सरकारी संख्या प्रत्यक्षाहून २९२ पटीने कमी

By admin | Updated: October 9, 2014 04:45 IST

२००६ ते २०१२ या सहा वर्षांत डेंग्युची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सरकारी दफ्तरात नोंद झालेल्या आकडेवारीहून प्रत्यक्षात २८२ पट अधिक होती

नवी दिल्ली : २००६ ते २०१२ या सहा वर्षांत डेंग्युची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सरकारी दफ्तरात नोंद झालेल्या आकडेवारीहून प्रत्यक्षात २८२ पट अधिक होती, असा संशोधन अहवाल भारत आणि अमेरिकेतील अभ्यासकांनी ‘अमेरिकन जर्नल आॅफ ट्रॉपिकल मेडिसिन अ‍ॅण्ड हायजीन’ या मान्यवर वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित केला आहे.सरकारी आकडेवारीनुसार याकाळात भारतात दरवर्षी सरासरी २०,४७४ व्यक्तींना डेंग्युची लागण झाली व एकूण १३६ मृत्यू झाले. मात्र प्रत्यक्षात याहून २८२ पटींने अधिक म्हणजे सुमारे ६० लाख लोकांना या काळात डेंग्युने ग्रासले, असा दावा या संशोधन अहवालात करण्यात आला आहे.डेंग्युच्या या व्यापक प्रसारामुळे या काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर १.१ अब्ज डॉलरचा आर्थिक बोजा पडला, असा अंदाजही त्यात करण्यात आला आहे. डेंग्युमुळे झालेली ही आर्थिक हानी भारत अंतराळ संशोधनावर जेवढा खर्च करतो त्याच्या बरोबरीची आहे.वाल्थॅम, मॅसेच्युसेट््स येथील ब्रँडीस विद्यापीठाची स्नेयडर इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ पॉलिसी, नवी दिल्लीतील ‘इनक्लेन ट्र्स्ट इंटरनॅशनल’ आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे मदुराई येथील ‘सेंटर फॉर रीसर्च इन मेडिकल एन्टॉमॉलॉजी’ यांनी मिळून हा संशोधन अहवाल तयार केला आहे.आतापर्यंत डॉक्टरी तपासणीनंतर स्पष्ट झालेल्या डेंग्युच्या रुग्णांचीच आकडेवारी सरकारी दफ्तरात नोंदविली जात असे. याचे संकलन ‘नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीजेस कन्ट्रोल प्रोग्रॅम’ ही केंद्र सरकारची संघटना करते. त्यानुसार २००६ ते २०१२ या काळात भारतात डेंग्युची लागण होण्याचे सरासरी प्रमाण २०,४७४ असून या काळात डेंग्युमुळे झालेले मृत्यू १३६ आहेत.या संशोधन अहवालाचे प्रमुख लेखक व ब्रँडीस विद्यापीठाचे आरोग्य अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक डोनाल्ड शेपर्ड यांनी सांगितले की, २००६ ते २०१२ या काळात भारतात ‘क्लिनिकल’ तपासणीतून उघड झालेल्या डेंग्युच्या रुग्णांची संख्या प्रत्यक्षात सरकारी आकडेवारीहून ३०० पट अधिक म्हणजे वर्षाला ६० लाख एवढी होती. तरीही आम्ही अंदाज केलेला हा आकडाही वास्तवाहून कमी असावा असे आम्हाला वाटते. याचे कारण असे की, आम्ही यासाठी तमिळनाडू या राज्यास आधार मानून पाहणी केली. तेथे देशाच्या इतर भागांच्या तुलनेत साथीच्या रोगांची निगराणी व नोंदणी व्यवस्था अधिक कार्यक्षम आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)