शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारनेच काढला सहकार कायदा मोडीत, संचालक मंडळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 01:47 IST

राज्यातील २२ जिल्हा सहकारी बँका, ८ हजार सोसायट्या तसेच अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत जानेवारी ते जून या कालावधीत संपत होती.

- सुधीर लंकेअहमदनगर : वेगवेगळी कारणे देत राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. मात्र, विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची तरतूदच कायद्यात नसल्याने या संस्थांवर तातडीने प्रशासक नेमणे गरजेचे होते. ही त्रुटी लक्षात येताच सरकारने अधिसूचना काढत मुदत संपलेल्या संचालक मंडळांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. सहकारावर असा वरदहस्त दाखविताना ग्रामपंचायतींवर मात्र प्रशासक नेमण्याचे धोरण घेण्यात आले आहे.राज्यातील २२ जिल्हा सहकारी बँका, ८ हजार सोसायट्या तसेच अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत जानेवारी ते जून या कालावधीत संपत होती. मात्र कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सहकारातील सर्वच निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने जानेवारीत घेतला. उच्च न्यायालयाने १३ मार्च रोजी या आदेशास स्थगिती दिली. मात्र त्यानंतर सरकारने कोविडचे कारण देत दोनदा निवडणुका पुढे ढकलल्या. सहकारी संस्था अधिनियम कलम ७३ कनुसार सरकार नैसर्गिक आपत्तीत निवडणुका पुढे ढकलू शकते. मात्र, संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची तरतूद यात नाही. संचालक मंडळाची मुदत संपताच तेथे प्रशासक यायला हवा.का दिली मुदतवाढ?९७ व्या घटनादुरुस्तीनुसार सहकारी संस्थांचे क्रियाशील सभासदच जिल्हा सहकारी बँकांचे मतदार असतात. मात्र, अनेक सहकारी संस्था थकबाकीदार असल्याने त्यांच्या पंच कमिटीत मतदानाचे ठराव होऊ शकले नाहीत.कर्जमुक्तीनंतर या संस्था आपोआप थकबाकीतून बाहेर पडणार होत्या. त्यामुळे सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याची चाल खेळली असा संशय आहे.प्रशासक नियुक्त केल्यास अनेक जिल्हा सहकारी बँकांमधून साखर कारखान्यांना कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या असत्या. त्यामुळेही प्रशासक नियुक्त करण्यात आले नाहीत, असे बोलले जाते.सरकारने निवडणुकांना मुदतवाढ दिली, संचालक मंडळाला नव्हे. त्यामुळे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांवर तातडीने प्रशासक यायला हवे होते. राज्यपालांनी १० जुलैला अधिसूचना काढून कायद्यात दुरुस्ती केली. मात्र तत्पूर्वीच मुदत संपलेल्या संचालक मंडळांचे काय? याबाबत शेतकरी संघटनेची याचिका उच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली आहे. - अ‍ॅड. अजित काळेसहकारी संस्थांच्या निवडणुकांना जानेवारीपासून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर संचालक मंडळांना मुदतवाढ देण्याबाबत १० जुलैला अधिसूचना काढली आहे.- अनिल कवडे,सहकार आयुक्त