शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकार वाट चुकल्यासारखं वागायला लागलंय

By admin | Updated: May 29, 2017 03:22 IST

महाराष्ट्रापुढे पाणी आणि वाढते नागरीकरण हे दोन मुख्य जटील प्रश्न आहेत. कचरा, पाणी हे मूलभूत प्र्रश्न सोडविण्याऐवजी स्मार्ट सिटीच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्रापुढे पाणी आणि वाढते नागरीकरण हे दोन मुख्य जटील प्रश्न आहेत. कचरा, पाणी हे मूलभूत प्र्रश्न सोडविण्याऐवजी स्मार्ट सिटीच्या भंपकपणावर सरकार भर देते आहे. वाढत्या नागरिकरणामुळे कचऱ्याचा प्र्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिजे जात नाही. त्याकडे लक्ष देण्याऐवजी सरकार वाट चुकल्यासारखं वागायला लागलंय, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केली.बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार पाणलोट क्षेत्र विकासाचे प्रणेते विजय बोराडे, ज्येष्ठ कीर्तनकारक हभप रामदासमहाराज, मृदाशास्त्रज्ञ डॉ. एम. सी. मन्ना यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी, माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘पाश्चात्य देशांचे अनुकरून करून स्मार्ट सिटीची संकल्पना आणण्यात आली आहे. या संकल्पनेला मी सुरुवातीपासून विरोध केला आहे. पाश्चात्य देशांमध्ये विकसित शहरांना तंत्रज्ञानावर आधारीत आणखी चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी स्मार्ट सिटीची संकल्पना राबविण्यात येऊ लागली. आपल्याकडे कचरा, पाणी अशा मूलभूत समस्या सुटलेल्या नसताना स्मार्ट सिटीची स्पर्धा राबवून शहर स्मार्ट करण्याच्या मागे धावले जात आहे.’साखळी सिमेंटचे बंधारे बांधण्याची संकल्पना जलयुक्त ग्राम योजना या नावाने आमच्या सरकारने सुरू केली. मात्र याच योजनेचे नाव ‘जलयुक्त शिवार योजना’ असे करून तिचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केले जात आहे. त्यामध्ये अशास्त्रीय पद्धतीने खोलीकरण केले जात आहे. जंगलतोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अशी टीका चव्हाण त्यांनी केली.रामदास महाजन म्हणाले, ‘संत सांप्रदायामध्ये लाडूचा व झाडूचा विचार सांगणारे असे दोन पंथ आहेत. गाडगेमहाराज आणि कैकाडीमहाराज यांनी गावागावांमधून प्रबोधनाचा विचार पुढे नेला. प्रबोधनाचे विचार मांडणाऱ्या सर्व कीर्तनकारांना एकत्र आणण्यासाठी संत भारती ही संकल्पना बाळासाहेब भारदे यांनी मांडली होती. मात्र ती काही कारणाने पूर्णत्वास जाऊ शकली नाही. आगामी काळात ती पुढे नेण्यासाठी ट्रस्टने पुढाकार घ्यावा.’ विजय बोराडे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार या योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास हा शब्दच गायब झाला आहे. मृदासंधारणावर आधारीत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे आवश्यक असताना जलयुक्त शिवार योजनेत अशास्त्रीय पद्धतीने खोलीकरणावर भर दिला जात आहे.’’ काश्मीरमधील  परिस्थिती गंभीरश्रीनगरचा काँग्रेस पक्षाचा प्रभारी म्हणून मी काम केले आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी मी काल श्रीनगरला गेलो होतो. पूर्वीच्या तुलनेत कश्मीरमधील परिस्थिती खूपच गंभीर बनल्याचे चित्र दिसून आले. शाळकरी मुले हातात दगड उचलून फेकत आहेत. नोटा बदलल्या म्हणजे दहशतवाद संपेल, कश्मीरचा प्रश्न सुटेल या भ्रमात मोदी सरकार वावरत होते, ते खोटे ठरले आहे अशी जोरदार टिका पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.