शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापा-यांपुढे सरकार नरमले, आडत बंदीला तात्पुरती स्थगिती

By admin | Updated: December 22, 2014 12:55 IST

आडत बंद करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिल्याची घोषणा राज्याचे सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळात केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. २२ - आडत बंदीविरोधात व्यापा-यांनी बंदचे हत्यार उपसल्याने राज्य सरकारने नरमाईची भूमिका घेतली आहे. शेतक-यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये वसूल केली जाणारी आडत बंद करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिल्याची घोषणा राज्याचे सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळात केली आहे. 

तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारने आडत बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी या निर्णयाची घोषणाही केली होती. मात्र या निर्णयाविरोधात राज्यभरातील व्यापा-यांनी विरोध दर्शवला होता. नाशिक व अन्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापा-यांनी आज बंदही पुकारला होता. व्यापा-यांच्या वाढत्या विरोधापुढे राज्य सरकारने सोमवारी नमती भूमिका घेतली. आडत बंदीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देत असून १५ दिवस अडते व शेतक-यांसोबत बैठक घेऊ अशी माहिती चंद्रकात पाटील यांनी विधानसभेत दिली. 

आडत म्हणजे काय ?

बाजारसमितीमध्ये शेतक-यांकडून आडतदारांकडे माल आणला जातो. या मालाची विक्री झाल्यावर शेतक-यांच्या पट्टीतून आडत कपात केली जाते. पणन संचालकांनी या पद्धतीमध्ये बदल केला होता. नवीन पद्धतीनुसार आडतदारांनी शेतक-यांकडून आडत कपात न करता खरेदीदाराकडून एक टक्के आडत कपात करावी असा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शेतक-यांचे हित झाले असते.  तर यामुळे बाजारसमित्यांमध्ये व्यापार करणे अशक्य होईल असे व्यापा-यांचे म्हणणे आहे.