शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला कामगारांचा हिसका दाखवावा लागेल

By admin | Updated: April 29, 2017 02:46 IST

निवडणुका आल्या की भाजपा सरकार नुसते आश्वासने देते. मात्र, भाजपाक डून आश्वासनांची पूर्तता होत नाही.

पिंपरी-चिंचवड : निवडणुका आल्या की भाजपा सरकार नुसते आश्वासने देते. मात्र, भाजपाक डून आश्वासनांची पूर्तता होत नाही. यासाठी सर्वपक्षीयांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक आहे. कामगारांचा हिसका जोपर्यंत या सरकारला दाखवला जात नाही, तोपर्यंत या कामगार नगरीतील समस्या सुटणार नाहीत, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला.पिंपरी-चिंचवड शहरात भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडले. शहरातील सर्व पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची भाजपाला आठवण करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीयांनी बुधवारी चिंचवड येथील महावीर चौैकात ‘आश्वासनांची आठवण’ आंदोलन करून लाक्षणिक उपोषणही केले होते. या आंदोलकांना धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मार्गदर्शन केले.मुंडे म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या प्रचारावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे तसेच शास्तीकर माफीचे आश्वासन दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा झाली. भाजपा सरकारला जरी आश्वासनांचा विसर पडला असला तरी येत्या पावसाळी अधिवेशनात त्यासाठी संघर्ष करणार आहे.’’ (प्रतिनिधी)सरकार केवळ संघधार्जिणेया आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेले माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे म्हणाले की, भाजपा सरकार गरिबांचे नसून त्यांना सामान्यांच्या समस्यांबाबत देणेघेणे नाही. शेतकरी आत्महत्या झाल्या किंवा महागाईने सामान्य जनता होरपळली तरी या सरकारला सोयरसुतक नाही. भाजपाच्या नेत्यांना केवळ सत्ता आणि सत्ताच हवी आहे. संघधार्जिण्या सरकारला धडा शिकवावाच लागेल. मुंडे यांच्या भेटीनंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आंदोलनकर्त्यांचा मोर्चा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाकडे निघाला. त्या वेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी भाजपा आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत तूर रस्त्यावर टाकण्यात आली.