शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला बालधोरणाचा विसर

By admin | Updated: January 11, 2015 02:22 IST

सरकारला राज्याच्या पहिल्या बालधोरणाचा विसर पडल्याचे दिसते. या धोरणाचा अंतिम आराखडा तयार होऊन वर्ष उलटले, तरी त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही.

राजानंद मोरे - पुणेसरकारला राज्याच्या पहिल्या बालधोरणाचा विसर पडल्याचे दिसते. या धोरणाचा अंतिम आराखडा तयार होऊन वर्ष उलटले, तरी त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. तसेच, बालहक्क संरक्षण आयोगाला तीन वर्षांपासून अध्यक्ष व सदस्यच मिळालेले नाहीत! बालकांच्या प्रश्नावर सरकार किती संवेदनशील आहे, हेच यावरून स्पष्ट होते.राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने २०१३ मध्ये तत्कालीन महिला व बाल कल्याणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्याचे पहिले विस्तृत बालधोरण तयार करण्यासाठी पुढाकार घेतला.महिला धोरणापाठोपाठ बालधोरणही प्रत्यक्षात येईल, अशी अपेक्षा त्या वेळी होती. बालधोरणाचा आराखडा वर्षभरापूर्वीच तयार करण्यात आला असून, मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, निवडणुकांची रणधुमाळी आणि त्यानंतर बदललेल्या सरकारमुळे बालधोरण अडगळीत पडल्याचे दिसते.बालधोरणाचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र मधल्या काळात सरकार बदलले. त्यामुळे धोरणात काही नवीन गोष्टींचा समावेश करायचा असल्यास त्यासाठी पुन्हा बैठक घ्यावी लागेल. पुढील काही दिवसांत याबाबत निर्णय होईल.- राजेंद्र चव्हाण, आयुक्त, महिला व बालकल्याणमुलांच्या हक्कांना महत्त्व देण्याचे धोरण सरकारचे असले पाहिजे. बालधोरण किंवा बाल हक्क संरक्षण आयोगाला अध्यक्ष मिळाल्याने सर्व काही ठीक होईल, असे नाही. मात्र सध्याच्या परिस्थतीत निश्चितच बदल होईल. त्यामुळे सरकारने याची दखल घ्यायला हवी.- सूर्यकांत कुलकर्णी, माजी सदस्य, बालहक्क संरक्षण आयोगबालकांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बालहक्क आयोगाला मागील तीन वर्षांपासून अध्यक्ष व सदस्य मिळालेले नाही. सचिवांच्या डोक्यावर कामाचा सर्व बोजा टाकून सरकार निर्धास्त आहे. मतदारांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले नवीन सरकार बालकांसाठी कधी ‘अच्छे दिन’ आणणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.