शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी उपाययोजनांत सरकार अपयशी

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा देशापुढील ज्वलंत, गंभीर प्रश्न असून केंद्र व राज्य सरकार दुष्काळावर उपाययोजना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा देशापुढील ज्वलंत, गंभीर प्रश्न असून केंद्र व राज्य सरकार दुष्काळावर उपाययोजना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी केली.कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे संस्थापक दिवंगत नानासाहेब सगरे यांच्या सहकार शिल्पाचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार जयंत पाटील होते.पवार म्हणाले की, शेतकरी दुष्काळात होरपळू लागला आहे. जनावरे कत्तलखान्यात जाऊ लागली आहेत. राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सिंचन योजनांची कामे रखडली आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे. वेळप्रसंगी संघर्षाचा मार्ग पत्करू व राज्य शासनाला वठणीवर आणू. कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्याला विकासवादी नेत्यांची फळी मिळाली. त्यातील नानासाहेब सगरे हे राजारामबापूंच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले होते. जनतेसाठी धडपडणारा हा माणूस होता. त्यांनी दुष्काळी पठारावर जिद्दीने कारखाना स्थापन करून तो चालविला.आमदार जयंत पाटील म्हणाले की, आमचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला, परंतु हे सरकार शेतकऱ्यांचा मुळावर उठले आहे. आधी पैसे भरा, मगच पाणी, ही सरकारची भूमिका चुकीची आहे. आम्ही आमच्या हयातीत एवढे महागडे पाणी बघितले नव्हते. म्हैसाळ, टेंभू, आरफळ या योजना पूर्ण करण्याची पात्रता राज्य सरकारची नाही. डॉ. पतंगराव कदम यांनी भाजपच्या खोट्या आश्वासनांना भुलून मतदारांनी सत्ता दिली, परंतु आता सर्वांनाच त्याचा मन:स्ताप होत आहे. भविष्यात हीच जनता भाजपची सत्ता उलथवून टाकेल, असे सांगितले.विजय सगरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार प्रभाकर कोरे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक, प्रा. शरद पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख, गणपतराव पाटील, अरुण लाड, गणपती सगरे, दिलीप पाटील, इलियास नायकवडी, चंद्रकांत हाक्के, ताजुद्दीन तांबोळी, सुरेश पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)पाणीपट्टी कमी करण्यासाठी पवार यांनी लक्ष घालावे : सुमनताई सिंचन योजनांची पाणीपट्टी जास्त आहे. ती कमी करण्यासाठी शरद पवार यांनी लक्ष घालावे व दुष्काळी तालुक्यांचा पाणीप्रश्न मिटवावा, अशी मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी केली.