खामगाव : नवीन मोटार सायकल, स्कूटर, मोपेड, सायकल व अपंग राज्य शासकीय कर्मचार्यांसाठी तीन चाकी स्वयंचलीत सायकल किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचार्यांना अग्रीम देण्याचा निर्णय राज्य शासनाने २0 ऑगस्ट रोजी घेतला आहे. राज्य शासनातील कर्मचार्यांना वाहन खरेदी करण्यासाठी एक रकमी पैसे नसल्यास त्यांना बँक किंवा खाजगी कंपन्यांकडून लोन घेऊन त्याची फेड करावी लागते. अनेक वेळा यामध्ये अडचणी येतात. याचा व्याज दरही जास्त असतो. यामुळे अनेक दिवसापासून शासनेने कर्मचार्यांना वाहन खरेदी साठी अग्रीम देण्याची मागणी कर्मचार्यांकडून होत होती. यामुळे शासनाने अखेर ती मागणी मान्य केली आहे. ज्या शाकीय कर्मचार्यांचे वेतन बँड मधील मासिक वेतन रु. ८५६0 ग्रेड वेतन वगळून अधिक आहे अशा कर्मचार्यांना मोटारसायकल खरेदीसाठी अग्रीम मिळणार आहे. वेतन बँड मधील मासिक वेतनाच्या ९ पट एवढी रक्कम किंवा ७0 हाजार रुपये किंवा मोटार सायकलची प्रत्यक्ष किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल तेव्हडी अग्रीम मिळणार आहे. अशाच प्रकारे स्कूटर खरेदी करण्यासाठी ही २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. याच बरोबर मोपेड खरेदी साठी ही २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर सायकल खरेदीसाठी ३ हजार ५00 रुपये देण्यात येणार आहेत. अग्रीम मिळण्यासाठी अर्ज करणार्या कर्मचार्यांची सेवेतील नियुक्ती संबंधित पदाच्या सेवाभरती नियमानुसा झालेली पाहिजे. त्याची सेवा कमीत कमी ५ वर्षाची असली पाहिजे. मात्र या अटीमधून अपंग व्यक्ती ना वगळण्यात आले आहे. ** अग्रीम मिळण्यासाठी कर्मचार्यांना वाहन चालवण्याचा परवाना, याच बरोबर वाहन खरेदी करण्याची संपुर्ण कागद पत्रे सादर करावी लागणार आहेत. अग्रीम मिळाल्या नंतर एका महिन्याच्या आत वाहन खरेदी केले पाहिजे. नाहितरमिळालेली रक्कम एक रकमी वसूल करुन त्याची दंड ही वसूल करण्यात येणार आहे. ** अग्रीम मिळण्यासाठी १ मे २00१ नंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असणार्या कर्मचार्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही एक महत्वाची अट या निर्णयामध्ये टाक ण्यात आली आहे.
वाहन खरेदीसाठी शासकीय कर्मचार्यांना मिळणार अग्रीम
By admin | Updated: August 21, 2014 22:18 IST