शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था

By admin | Updated: April 3, 2017 03:38 IST

पनवेल महापालिका हद्दीतील जुना ठाणा नाका रस्त्यावरील सरकारी वसाहतीची दुरवस्था झाली

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील जुना ठाणा नाका रस्त्यावरील सरकारी वसाहतीची दुरवस्था झाली असून, या ठिकाणी ५२ कुटुंबे रामभरोसे राहत आहेत. सरकारी कर्मचारी असल्याने कुणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या वसाहतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मोडकळीस आलेल्या इमारती, परिसरात अस्वच्छतेबरोबरच पाण्याच्या टाक्यांची दैना झाली असून, संरक्षण भिंतीचा तर पत्ताच नाही. ड्रेनेज लाइन तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे, शिवाय दुर्गंधीही पसरली आहे. भटक्या प्राण्यांचा वावर आदी समस्यांमुळे परिसरातील कुटुंबे त्रस्त असून याप्रकरणी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. रायगड जिल्हा परिषदेचा कर्मचारीवर्ग राहत असलेल्या पनवेल येथील शासकीय वसाहतीत सहा इमारतींत द्वितीय श्रेणी अधिकाऱ्यांच्या २, चतुर्थ श्रेणी अधिकाऱ्यांच्या ६ आणि तृतीय श्रेणी अधिकाऱ्यांच्या ३४ व इतर अशा एकूण ५२ खोल्या आहेत. मात्र, वसाहतीच्या दुरवस्थेमुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. दुरवस्थेबाबत परिसरातील तरुण संबंधित विभागाकडे तक्रार करण्यासाठी गेले असता, राहायचे तर राहा, नाहीतर निघून जा, असे उत्तर दिले जाते. गेल्या पाच वर्षांत इमारतीला रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. येथील पाण्याची टाकी इतकी धोकादायक झाली आहे की कधीही कोसळू शकते. इमारतीला तडे गेले आहेत. रहिवाशांनी स्वखर्चाने पंपहाउस दुरुस्तीचे तसेच ड्रेनेजचे काम केले आहे. मात्र वीजबिल न भरल्यामुळे महावितरणने गेल्या महिन्यात पंपहाउसची वीज खंडित केल्याचे समजते. येथील इमारतींच्या जिन्यावर विजेची व्यवस्था नाही. वसाहतीत धूरफवारणी होत नसल्याने डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. वसाहतीला संरक्षण भिंत नसल्याने भटके प्राणी, फेरीवाल्यांचा सर्रास वावर असतो. पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्याही याच परिसरात उभ्या असतात. या वसाहतीला पालिकेकडून दिवसातून अर्धा तास पाणी दिले जाते. येथे नळजोडण्या वाढवण्याची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. (वार्ताहर)पाण्याची टाकी झाली धोकादायकवसाहतीत पिण्याच्या पाण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ केल्या जात नाही. त्यामुळे सतत आरोग्याच्या व्याधी उद्भवतात. पाणी सोडणारा कर्मचारी स्वत:च्या सोयीनुसार काम करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. इमारतीला रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. येथील पाण्याची टाकी इतकी धोकादायक झाली आहे की कधीही कोसळू शकते. इमारतीला तडे गेले आहेत.