शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचाऱ्यांचे बँक खाते परस्पर जनधनमध्ये परावर्तीत

By admin | Updated: December 23, 2016 04:04 IST

कोणताही अर्ज केला नसताना अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे नियमित बँक खाते जनधन योजनेच्या खात्यात परावर्तीत करण्यात

वरोरा (चंद्रपूर) : कोणताही अर्ज केला नसताना अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे नियमित बँक खाते जनधन योजनेच्या खात्यात परावर्तीत करण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतापामुळे खात्यातून पैसे काढण्याला आता मर्यादा आल्याने कर्मचाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. या बाबीकडे बँकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित कर्मचारी त्रस्त झाले आहेत.शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँक खात्यात जमा होते. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार या कर्मचाऱ्यांना आठवड्याला २४ हजार रुपये काढता येतात. तर, जनधन खात्यातून १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येत नाही. या संदर्भात खाते परावर्तीत झालेले कर्मचारी बँकेत अर्ज देऊन विचारणा करीत आहेत. मात्र त्याला बँकेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. (प्रतिनिधी)बँकांचा नवीन खाते उघडण्याचा सल्लानियमित बँक खाते जनधन योजनेत परावर्तीत झाले असल्याने आता याच बँकेत दुसरे बचत खाते उघडण्याचा सल्ला बँकेचे अधिकारी देत आहेत. नवीन खाते उघडण्याकरिता प्रक्रिया कोण करणार, यावरही बँकेकडून उत्तर मिळत नाही. त्यातच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याने वेतनाकरिता नवीन बँक खाते उघडल्यास त्याची माहिती आपल्या कार्यालयाच्या मुख्यालयी द्यावी लागते. त्यामध्ये दीड ते दोन महिन्यांचा वेळ निघून जातो.रिझर्व्ह बँकच देईल निर्देश : यासंदर्भात संबंधित बँक अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, बँक खाते परावर्तीत करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेलाच असल्याने तेच पुढील निर्देश देतील.