शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

राज्यात युतीचे सरकार नकोच!

By admin | Updated: October 5, 2014 22:33 IST

नरेंद्र मोदी : बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील आदरापोटी शिवसेनेवर टीका करणार नाही

सांगली : महाराष्ट्रापुढील समस्यांचे कारण युती-आघाड्यांचे सरकार हेच असून, युतीच्या चक्रातून राज्याला सोडवा आणि भाजपला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहन करत बाळासाहेब ठाकरेंप्रती आदर आणि श्रद्धा असल्यानेच त्यांच्या पश्चात होणाऱ्या या निवडणुकीत शिवसेनेवर काहीही बोलणार नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी दिले. शरद पवारांनी आमच्या शिवभक्तीवर शंका घेऊ नये, त्यांच्यात शिवरायांचे गुण येणे अशक्य आहे, असा हल्लाही मोदी यांनी चढविला. तासगाव येथील भाजपच्या प्रचारसभेत ते बोलत होते. बाळासाहेबांनी अनेक अडचणींवर मात करीत शिवसेना वाढवली. त्यांच्याबद्दल आदर असल्यानेच शिवसेनेवर काहीही न बोलणे हे माझे कर्तव्य आहे, असे सांगत मोदींनी महायुती तुटल्यानंतर शिवसेनेकडे जाणारी सहानुभूती वळविण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या तासगावात मोदींनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांच्या घड्याळातील काटे हललेले नाहीत, हे महाराष्ट्राचे भविष्य कसे ठरविणार? पवारांना इतिहासाचे ज्ञान नाही. मुंबईच्या विमानतळाला आणि व्हिक्टोरिया टर्मिनसला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वाजपेयी सरकारनेच दिले आहे. आम्ही सूरतमध्ये बारामतीपेक्षा मोठा शिवरायांचा पुतळा उभा केला आहे. त्यामुळे पवारांनी आमच्या शिवभक्तीवर शंका घेऊ नये. ते अनेक वर्षे मुख्यमंत्री होते, नंतर केंद्रीय कृषिमंत्री होते. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन पवारांनी जलसंवर्धन केले असते, तर शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ आली नसती. साखर कारखान्यांना त्यांनी राजकारणाचा अड्डा बनविला आहे. गुजरात हा आजही महाराष्ट्राचा छोटा भाऊ आहे. महाराष्ट्राला नर्मदा प्रकल्पातून चार हजार कोटींची वीज गुजरात देणार आहे. शीतपेयांमध्ये केवळ पाच टक्के फळांचा रस घातला, तरी भारतातील फळ उत्पादकांना मोठा फायदा होईल. तशी विनंती अमेरिकेतील शीतपेय कंपन्यांना केली आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत त्यावर संशोधन करण्याची ग्वाही त्या कंपन्यांनी दिली आहे. जपानने भारतात दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्याला स्थिरता आणि गती देण्यासाठी भाजपला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहनही मोदी यांनी केले.गृहमंत्री पाटील अपयशी : फडणवीसतासगावचे पार्सल मुंबईमध्ये फेल झाले आहे. ते तासगावमध्येच ठेवून घ्या. हा बोलका पोपट मुंबईला पाठवू नका. गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना शंभरपैकी ९१ जणांना शिक्षा होत होती. मात्र यांच्या काळात शंभरपैकी ५५ जण सुटतात. पोपटपंची करणारे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत, अशी टीका / भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आर. आर. पाटील यांच्यावर केली. खा. संजय पाटील म्हणाले की, लोकसभेवेळी सांगलीच्या जनतेने भाजपवर विश्वास दाखविला. विधानसभेलाही जनतेने आम्हाला साथ द्यावी. जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. उद्योगधंदे नसल्याने सुशिक्षित तरुण बेरोजगार झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या दोन्ही गोष्टीत लक्ष घालावे. केंद्र शासनाने सिंचन प्रकल्पासाठी विशेष निधी आणि जिल्ह्यात उद्योगधंदे आणण्यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ म्हणाले की, मी राजकारणात उतरल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. सांगली शहराची अवस्था खेड्यापेक्षाही वाईट झाली आहे. समस्याग्रस्त शहर म्हणून ओळख होत आहे. नागरिकांना या समस्येतून मुक्त करण्यासाठीच मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. गेली अनेक वर्षे सत्तेत असलेल्या मंडळींना सांगलीचा विकास करता आलेला नाही. यावेळी शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख यांचेही भाषण झाले. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे-म्हैसाळकर, शहर-जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, रमेश शेंडगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)आर. आर. पाटील यांना अडकवून ठेवण्याची खेळीमाजी गृहमंत्री आर. आर. पाटील राज्यभरात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी फिरत आहेत; मात्र त्यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी भाजपने नरेंद्र मोदी यांची सभा तासगावात ठेवली. खासदार संजय पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी हालचाली करून मोदींच्या या सभेसाठी आग्रह केल्यानंतर ऐनवेळी सभेचे नियोजन करण्यात आले. या सभेद्वारे खा. पाटील यांनी शक्तिप्रदर्शनाची संधी साधली. सांगलीचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेवरील माजी आमदार, आर. आर. पाटील यांचे निकटवर्तीय रमेश शेंडगे यांचा याच सभेत भाजपप्रवेश झाला. त्यातून खा. पाटील यांनी आर. आर. पाटील यांना शह दिल्याचे बोलले जाते.