शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी डॉक्टरांचा बोगस डॉक्टरांवर भरवसा

By admin | Updated: June 6, 2017 02:51 IST

किरकोळ उपचारासाठी आलेल्या रुग्णांना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिंदे हे थेट खाजगी हॉस्पिटलमधील बोगस डॉक्टरकडे उपचारासाठी पाठवत असल्याचे दिसून आले

लोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : ग्रामीण रुग्णालयात अनेक समस्या असल्याने अगदी किरकोळ उपचारासाठी आलेल्या रुग्णांना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिंदे हे थेट खाजगी हॉस्पिटलमधील बोगस डॉक्टरकडे उपचारासाठी पाठवत असल्याचे दिसून आले आहे. या महागड्या उपचारामुळे शासनाच्या मोफत आरोग्यव्यवस्थेवर तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या व स्त्रीशक्ती संघटनेच्या पदाधिकारी नंदा गोडांबे यांना रात्रीच्या वेळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्यांच्या मुलांनी प्राथमिक उपचारासाठी मुरबाड ग्रामीण रु ग्णालयात नेले. तेथे ड्युटीवर असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिंदे यांनी कोणतेही प्राथमिक उपचार न करता थेट मुरबाडमधील गणपती हॉस्पिटलमध्ये जाऊन ईसीजी काढण्यास सांगितले. हे हॉस्पिटल एक एमडी डॉक्टर चालवत असून त्यांच्या गैरहजेरीत रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर कोणत्या आजाराचे तज्ज्ञ आहेत, हे त्यांनाच ठाऊक नाही. त्या डॉक्टरांनी नंदा गोडांबे यांचा ईसीजी काढला आणि त्यांच्या मुलांना सांगितले की, तुमच्या आईच्या हृदयाला दोन ब्लॉकेज आहेत. त्यांना तत्काळ अतिदक्षता विभागात अ‍ॅडमिट करावे लागेल. हे ऐकताच त्यांची मुले भयभीत झाली. मात्र, गोडांबे यांनी तातडीने अतिदक्षता विभागात अ‍ॅडमिट होण्याचे कारण काय, असे विचारले असता ग्रामीण रु ग्णालयाच्या डॉक्टरांनी तुम्हाला अ‍ॅडमिट करण्यास सांगितले, तसे करा. नंदा गोडांबे तेथे काढलेला ईसीजी घेऊन डॉ. शिंदे यांना दाखवण्यास ग्रामीण रु ग्णालयात गेल्या. रात्री अडीच ते तीनच्या सुमारास ड्युटीवर असलेल्या परिचारिका ससाणे यांनी डॉक्टर झोपले आहेत. तुम्ही सकाळी या, अशी कारणे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. डॉक्टर शिंदे तेथे आले. मात्र, त्यांनीही गोडांबे यांना एकेरी शब्दांत अरेरावीची भाषा वापरून अपमानित केले. यामुळे गोडांबे यांनी राज्याचे आरोग्य संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देऊन आपल्यावरील अन्यायाची दाद मागितली आहे.डॉ. शिंदे यांच्याशी संपर्कसाधला असता ते रु ग्णालयात उपलब्ध नव्हते. इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता ते फक्त शनिवार आणि रविवार दोनच दिवस रु ग्णांवर उपचार करतात आणि पगार मात्र सगळ्या दिवसांचा घेतात, असे सांगितले. >कारवाई अपयशी ठरली नागरिकांमध्ये संतापतालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास आरोग्य प्रशासन सप्शेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे या बोगस डॉक्टरांची दुकाने जोरात चालत असून त्यांना शासनाच्या आरोग्य विभागातील डॉक्टरच रु ग्ण पुरवत असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात तक्रार आली आहे. त्यासंदर्भात संबंधित डॉक्टर आणि परिचारिका आणि रुग्णालय प्रशासन यांचा तत्काळ खुलासा मागवण्यात आला आहे. तो मिळताच, कारवाई करु.- डॉ. केम्पी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक,ठाणे