शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण का केली? आमदार संजय गायकवाड म्हणाले, 'वरण खराब निघाल्याने..."
3
"लोक म्हणाले, न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा"; प्रिया फुके मुलासह 'शिवतीर्थ'वर पोहचल्या
4
मुंबई: आईला म्हणाला, 'लवकरच जेवायला घरी येतो' अन् ओंकारने अटल सेतूवरून मारली उडी; ३६ तासानंतरही शोध सुरूच
5
Video: स्टंपचे दोन तुकडे... Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने केला भन्नाट कारनामा
6
जमीन खणताच नशीब फळफळलं, मजुराच्या हाती लागली मौल्यवान वस्तू, काही तासांतच झाला लखपती    
7
Ahmedabad Plane Crash : विमान अपघातातील 'त्या' १९ लोकांवर गुजरात सरकारने केले अंत्यसंस्कार; पण कारण काय?
8
तुमचं जनधन खातं बंद होणार? खातेधारकांमध्ये गोंधळ, सरकारनं दिलं स्पष्टीकरण
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
10
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
11
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
12
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
13
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
14
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
15
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
16
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
17
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
18
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
19
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
20
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही

सरकारी डॉक्टरांची निवृत्ती ६०व्या वर्षी!

By admin | Updated: May 27, 2015 02:03 IST

राज्यातील सुमारे ११ हजार सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केला आहे.

यदु जोशी - मुंबईराज्यातील सुमारे ११ हजार सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केला आहे. सरकारी नोकरीची डॉक्टरांना अ‍ॅलर्जी असल्याने त्यावर इलाज म्हणून हा प्रस्ताव समोर आला असून, लवकरच तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येईल. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी ते राज्याचे आरोग्य संचालक यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. सध्या राज्यात तब्बल ३६ टक्के पदे रिक्त आहेत. सरकारी डॉक्टर होण्यास आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागात जाण्यास नवीन पिढी तयार नाही. अशा परिस्थितीत सरकारी डॉक्टरांचा नोकरीतील आहे तो टक्का टिकविण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी निवृत्तीचे वय वाढविण्याचा उपाय शोधून काढला आहे. वैद्यकीय प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय आघाडी सरकारने ६०वरून ६२ वर्षे तर नव्या सरकारने ६४ वर्षे केले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाला हा न्याय देताना आरोग्य विभागांतर्गतच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८वरून ६० करण्याचा आग्रह विभागाने धरला आहे.सरकारी नोकरीत जाण्याबाबत डॉक्टरांची अनास्था अलीकडेच प्रकर्षाने समोर आली. एमकेसीएलच्या माध्यमातून विविध पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली. २१०० जणांची निवड झाली; पण त्यातील केवळ ६४३ जणांनी नोकरीत रुजू होण्याबाबत संमती दिली. त्यातील ५२४ एमबीबीएस डॉक्टर होते तर अन्य विशेषज्ञ होते. प्रत्यक्षात २५० जण आतापर्यंत रुजू झाले आहेत. या नियुक्ती उमेदवारांना नियुक्तीचा पर्याय विचारून कौन्सिलिंगद्वारे करण्यात आल्या; तरीही अशी अवस्था आहे. विभागांचा निकष न लावता रिक्त जागा तिथे प्राधान्यभरतीची परवानगी द्यावी, असे प्रयत्न डॉ. दीपक सावंत सध्या करीत आहेत.