शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकांवर सरकारचा अंकुश

By admin | Updated: September 1, 2016 05:43 IST

वर्षाअखेर होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीवर नजर ठेऊन भाजपाच्या फायद्याचे गणित समोर ठेवत नगरपालिकांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात

यदु जोशी,  मुंबई वर्षाअखेर होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीवर नजर ठेऊन भाजपाच्या फायद्याचे गणित समोर ठेवत नगरपालिकांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात असताना आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदांतील विकास कामे ही सार्वजनिक बांधकाम खाते व अन्य शासकीय यंत्रणांमार्फत करण्याचा निर्णय घेऊन सरकारने हस्तक्षेपाचा नवा फॉर्म्यूला लागू केला आहे.आजवर हा निधी थेट नगरपालिकांच्या बँक खात्यात जमा व्हायचा आणि पालिकेमार्फतच तो खर्च करण्यात येत होता. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी देऊन त्यातील विकास कामे ही बांधकाम खात्यामार्फत करण्यात येणार आहेत. हा धक्कादायक प्रकार पहिल्यांदाच राज्यात घडत आहे. आमच्या काळात आम्ही असे कधीही केलेले नाही. हा राज्य शासनाचा स्थानिक स्वराज्य संस्थांवर घाला असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रभावक्षेत्रातील परळी नगरपालिकेलाही या हस्तक्षेपाचा फटका बसला आहे. त्यांनी सांगितले की, या नगरपालिकेला पाच कोटी रुपयांचा निधी तर मंजूर झाला पण त्यातून होणारी विकास कामे बांधकाम विभागाकडून केली जातील, असा अंकुश लावत नगरपालिकेचे पंख छाटण्यात आले आहेत. भाजपाधार्जिण्या कंत्राटदारांना वा थेट भाजपा कार्यकर्त्यांना कंत्राटे मिळावीत आणि विकास कामांचे श्रेय भाजपाला मिळावे असा दुहेरी डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. निधीचा एकत्रित आदेश यापूर्वी निघायचा पण यंदा वेगवेगळे आदेश निर्गमित करण्यात आले, ते शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले नाहीत. यापूर्वी परळी नगरपालिकेला रस्ते अनुदानापोटी अडीच कोटी रुपये अनुदान देण्यात आले होते. मात्र, एका मंत्र्याचा दबाव येताच तो ५० लाख रुपये करण्यात आला, असा आरोपही मुंडे यांनी केला. विकासाची कामे करण्यासाठी नगरपालिकेची अनुमती लागते. ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून घेतली जाते आणि ती विशिष्ट मुदतीत मिळाली नाही तर ती घेतल्याचे गृहित धरले जाते अशा तक्रारीदेखील आपल्याकडे आल्या आहेत, असे मुंडे म्हणाले.