शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘शासकीय संस्थांत समन्वय साधणे आवश्यक’

By admin | Updated: November 2, 2016 02:38 IST

विकासकामात या संस्थांशी समन्वय साधणे गरजेचे व तितकेच आव्हानाचे काम असल्याचे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी व्यक्त केले

नवी मुंबई : शहरात विविध शासकीय संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे विकासकामात या संस्थांशी समन्वय साधणे गरजेचे व तितकेच आव्हानाचे काम असल्याचे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी व्यक्त केले आहे. नवी मुंबई प्रेस क्लबच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद अधिकाऱ्यांशी’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. असे असले तरी या शहरात मुंबईपेक्षा सुंदर होण्याची क्षमता असल्याचे मत गगराणी यांनी व्यक्त केले. सुनियोजित शहर उभारताना चांगल्या पायाभूत सुविधा विकसित केल्या पाहिजेत. एखादी छोटीशी घटना घडली तरी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे लोकांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता, कायदा-सुव्यवस्था चांगली राखली गेल्यास लोकांचा वास्तव्यासाठी नवी मुंबई शहराकडे कल वाढेल, असे मत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी यावेळी संवाद साधताना सांगितले. नवी मुंबईमध्ये सामाजिक जबाबदारीचे भान बाळगून पत्रकार राबवत असलेल्या उपक्रमांची प्रशंसा करत कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. तर शहराचा सुनियोजित झालेला विकास, येथे असलेली मोकळी जागा, आदि बाबींवर नजर टाकताच आपल्याला बालपणीच्या जुन्या मुंबईची प्रकर्षाने आठवण झाल्याची कबुली सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे यांनी दिली. याप्रसंगी सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, पनवेल महापालिकेचे आयुक्त-प्रशासक डॉ. सुधाकर शिंदे, नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे, पोलीस उपआयुक्त दिलीप सावंत, पोलीस उपआयुक्त नितीन पवार, पोलीस उपआयुक्त प्रशांत खैरे, माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ, महापालिका उपआयुक्त उमेश वाघ, माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, ज्येष्ठ पत्रकार अशोक जालनावाला, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसाडीकर, दिलीप माने, सिडकोचे भूमी-भूमापन अधिकारी विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे, महापालिकेचे नगररचनाकार किशोर अग्रहारकर आदिंसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.