शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘लवासा’वर आता शासनाचे नियंत्रण

By admin | Updated: May 24, 2017 02:42 IST

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कल्पनेतून आकाराला आलेला ‘लवासा’ प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास

अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कल्पनेतून आकाराला आलेला ‘लवासा’ प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) वर्ग करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. जीएसटीच्या निमित्ताने सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी केलेली भाषणे विरली नाहीत तोच हा निर्णय सरकारने घेतला.लवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणानेच मनमानी कारभार केल्याने हा प्रकल्प अडचणीत आल्याचा ठपका लोकलेखा समितीने ठेवला होता. या प्रकल्पावर सरकारचे नियंत्रण आणण्यासाठी ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किंवा तत्सम अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे नगररचना संचालक आदींचा समावेश करावा, अशी शिफारसही समितीने केली होती. सरकारने ही शिफारस मान्य केली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या निर्णयामुळे आता लवासामधून मिळणारा विकास निधी, अतिरिक्त एफएसआयसाठी दिला जाणारा प्रिमियम शासनाला मिळेल. शिवाय, या भागात झालेली बेकायदा बांधकामे तपासण्याचा आणि प्रसंगी ती पाडण्याचाही अधिकार या प्राधिकरणाला मिळणार आहे.लवासा कापोर्रेशन लि. या आस्थापनाद्वारे पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि वेल्हे या तालुक्यांतील १८ गावांच्या परिसरात ५ टप्प्यांत लवासा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प शरद पवार यांच्या पुढाकाराने सुरु झाला होता. मात्र प्रारंभापासून याला विरोध होत आला. अनेक बेकायदेशीर कृत्ये करून पश्चिम घाटासारख्या नाजुक पर्यावरणाची कायमस्वरुपी हानी व सह्याद्रीची चाळण करून टाकणाऱ्या लवासा कंपनीच्या स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीची पुनर्रचना नव्हे तर ती रद्दच केली पाहिजे, अशी यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनाची मागणी होती.लोकलेखा समितीचे अध्यक्षपद काँग्रेसचे नेते गोपाळदास अग्रवाल यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्या समितीने लवासात अनेक सुनावण्या घेतल्या. पुण्यात अनेक बैठका केल्या. त्यानंतर त्यांनी २०१५-१६ या वर्षाचा अहवाल १७ मार्च रोजी विधानसभा आणि विधानपरिषदेत सादर करण्यात केला होता. त्यामध्ये तत्कालीन सरकारने लवासाला दिलेले अधिकार आणि त्यातून झालेली अनियमितता अग्रवाल यांनी मांडली होती. लवासा कंपनीने मोठया प्रमाणावर करचुकवेगिरी केली. कंपनीने २१४ हेक्टर जमीन आवश्यक त्या परवानग्या न घेताच खरेदी केली. ४.२३ कोटी रुपये किमतीची ही जमीन २००२ ते २००९ या काळात खरेदी केली असून ती सीलिंग कायद्याखाली येणारी जमीन आहे, परंतु त्यापैकी एक इंच जमिनीसाठीही पुणे जिल्हाधिकारी कचेरीची परवानगी लवासा कंपनीने घेतलेली नाही. यापैकी काही जमीनव्यवहारापोटी जिल्हाधिकारी कार्यालयाने ११.९० कोटी रुपयांचा दंड वसूल केलेला असून अद्यापही ९ व्यवहारांमध्ये रु. ३.९७ कोटी रुपये दंडाची वसुली होणे बाकी आहे. ही सर्व वसुली कॅगच्या कडक ताशेऱ्यानंतर सुरू करण्यात आल्याचे नमूद करून, त्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली होती.यापुढे थंड हवेची ठिकाणे विकसित करण्यासाठी सुस्पष्ट आणि पारदर्शी अशी स्वतंत्र विकास नियमावली सिद्ध करणे, प्रकल्पाला दिलेले ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ हे अधिकार तातडीने रद्द करावेत. लवासामध्ये सरकारी नियंत्रण येण्यासाठी नियमांमध्ये तात्काळ बदल करावेत, अशा शिफारसीही केल्या होत्या.न्यायप्रविष्ठ प्रकरणाचा पाठपुरावा देखील गंभीररीत्या केला जात नसून सरकारने या प्रकरणात चांगला वकील नेमावा. रॉयल्टीच्या वसुलीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१५ मध्ये दिलेल्या निर्णयानंतरही कार्यवाही झाली नाही, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे समितीने म्हटले होते.