शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची दोनदा वर्षपूर्ती !

By admin | Updated: December 3, 2015 09:12 IST

राज्यातील शिवसेना-भाजपा युती सरकारची वर्षपूर्ती ३१ आॅक्टोबर रोजी मोठ्या धूमधडाक्यात साजरी झालेली असताना, आता पुन्हा नव्याने वर्षपूर्तीचा सोहळा आयोजित करून, शिवसेनेने

- अतुल कुलकर्णी,  मुंबई

राज्यातील शिवसेना-भाजपा युती सरकारची वर्षपूर्ती ३१ आॅक्टोबर रोजी मोठ्या धूमधडाक्यात साजरी झालेली असताना, आता पुन्हा नव्याने वर्षपूर्तीचा सोहळा आयोजित करून, शिवसेनेने आपला सवतासुभा कायम ठेवला आहे. त्यामुळे एकाच सरकारची दोनदा वर्षपूर्ती, अशी अजब घटना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे.शिवसेनेने आपल्या ‘सत्तेचा’ वर्षपूर्ती समारंभ गुरुवारी रवींद्र नाट्य मंदिरात सायंकाळी ४ वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, शिवसेनेच्या दहा मंत्र्यांच्या कार्यपुस्तिकांचे प्रकाशन होणार आहे. यासाठी शिवसेनेने केलेल्या जाहिरातीत बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासह दहा मंत्र्यांचे फोटो छापले आहेत. ‘आमच्यात कोणताही वाद नाही, जर शिवसेनेचे मंत्री नाराज असते, तर त्यांनी आपली नाराजी मंत्रिमंडळ बैठकीत बोलून दाखवली असती,’ असे सांगणारे भाजपा नेते शिवसेनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. कदाचित शनिवारी शपथविधी !मंत्रिमंडळाचा गुरुवारी विस्तार होणार नाही, ही माहिती स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनीच ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र, नागपूर अधिवेशनाच्या आधी विस्तार होऊ शकतो, असे सांगत विस्ताराबाबतची उत्सुकता कायम ठेवली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी कदाचित शपथविधी होऊ शकतो. त्यात एखाद्या विद्यमान मंत्र्याची घरवापसी होऊ शकते व काहींची खाती बदलली जाऊ शकतात. शिवसेनेने त्यांची दोन नावे तयार ठेवल्याचे समजते.वर्षपूर्तीनिमित्त काढल्या जाणाऱ्या अहवालासाठी सेनेने प्रस्तावना मागितल्याची माहिती, स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ‘लोकमत’ला दिली. आपण अद्याप प्रस्तावना दिलेली नाही, पण कदाचित आज लिहून देईन, असेही ते म्हणाले. - ‘सेनेच्या वर्षपूर्तीविषयी आपल्याला काहीही माहिती नाही, आपण पेपर वाचलेला नाही,’ असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मात्र, खा. अनिल देसाई यांच्यासोबत विधानपरिषदेच्या जागांबद्दल बैठक झाल्याचे ते म्हणाले.- फडणवीस सरकारने ३१ आॅक्टोबरला वर्षपूर्ती साजरी केली, त्यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘आम्हाला कुठे वर्ष पूर्ण झाले?’ असे सांगत त्या सोहळ्यातून अंग काढून घेतले होते. भाजपा-सेनेचे जागावाटप : विधान परिषदेच्या आठ जागांसंदर्भात नवी दिल्ली येथे बुधवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सेनेचे खा. अनिल देसाई यांच्यात चर्चा झाली. यातील मुंबई, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि अहमदनगर अशा तीन जागा शिवसेना तर उर्वरित पाच जागा भाजपा लढविणार आहे.