शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ, गतिमान व विकासाकडे नेणारे सरकार - राज्यपाल

By admin | Updated: November 12, 2014 17:13 IST

राज्यात २४ तास वीज व पाणी, प्रमुख शहरांना जोडण्यासाठी महामार्ग व एक्सप्रेस वेची बांधणी असा फडणवीस सरकारचा अजेंडा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधीमंडळातील अभिभाषणातून मांडला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १२ - राज्यात २४ तास वीज व पाणी, राज्यांतील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी महामार्ग व एक्सप्रेस वेची बांधणी, सहकारी बँकांचे पुनरुज्जीवन, पोलिस दलाचे आधुनिकीकरण असा फडणवीस सरकारचा अजेंडा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधीमंडळातील अभिभाषणातून मांडला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान शिवसेना आमदारांनी राज्यपाल चले जाव, दादागिरी नही चलेगी अशी घोषण देत विरोध दर्शवला आहे. 
फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान राज्यपाल विद्यासागर राव यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित केले. राज्यपालांनी अभिभाषण करु नये अशी मागणी करणारे पत्रच काँग्रेस आमदारांनी राज्यपालांना पाठवले. मात्र यानंतरही राज्यपाल अभिभाषणासाठी विधीमंडळात पोहोचले. यानंतर शिवसेना आमदारांनी राज्यपालांची गाडी रोखून ठेवली. सुमारे पाच ते दहा मिनीटानंतर राज्यपालांनी गर्दीतून मार्ग काढत विधीमंडळ गाठले. भाषणाच्या अखेरीस काँग्रेस आमदारांनी सभात्याग करत आपला विरोध दर्शवला.
 
राज्यपालांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
> महाराष्ट्रातील नवीन सरकार विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षापूर्ण करण्यासाठी कटीबद्ध
> सरकारच्या व्हिजन डॉक्यूमेंटमधील आश्वासनं लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न.
> राज्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करणार 
> आपले सरकार या नावाने नवीन संकेतस्थ व मोबाईल अ‍ॅप तयार करणार 
> मुंबईतील अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा तर इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार 
> उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी जाचक अटी रद्द करणार 
> पोलिस दलाचे आधुनिकीकरण करताना त्यांना चांगली निवासस्थान व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यास नवीन सरकार कटीबद्ध
> सिंचनाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विशेष तरतूद
> नवी मुंबईतील विमानतळाच्या कामाला वेग देणार
> सहकारी बँकांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दोन महिन्यात नवीन धोरण मांडणार
> पर्यायी व्यवस्था तयार करुन एलबीटी रद्द करणार 
> जलसंधारण, सौर उर्जेला प्राधान्य
> ई टेंडरिंग सुविधा वापरण्यास प्राधान्य
> पुण्याला देशातील आयटी हब बनवणार 
> मराठवाड्यात स्वीट लाइम युनिट सुरु करणार 
> नागपूरमध्ये संत्र्यांवर प्रक्रिया करणारे युनिट
> दलित अत्याचार रोखण्यासाठी कठोर धोरण आणि या खटल्यांचा तातडीने निकाल लागावा यासाठी प्रयत्न करणार