शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत शासन अनुकूल

By admin | Updated: February 20, 2016 03:10 IST

राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूचे आहे. याबाबत न्यायालयात पुरेपूर बाजू मांडण्यात येईल, मराठा समाजातील वंचितांना जरूर आरक्षण देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी केले

लेण्याद्री (पुणे) : राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूचे आहे. याबाबत न्यायालयात पुरेपूर बाजू मांडण्यात येईल, मराठा समाजातील वंचितांना जरूर आरक्षण देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी केले. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सव पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्री राम शिंदे, कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, आमदार सुभाष देशमुख आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, शिवरायांची स्मारके असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. पुरातत्त्व विभागाशी बोलून त्यातील अडसर दूर करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. शिवरायांचे प्रमुख ५ किल्ले ‘मॉडेल फोर्ट’ म्हणून विकसित करण्यात येतील. शिवजयंतीला शिवनेरीवर पास असल्याशिवाय येऊ देत नाहीत, ही शिवप्रेमींची तक्रार असल्याने, याबाबत पुढील वर्षापासून सुलभतेने शिवप्रेमींना गडावर येता येईल, अशी सोय करण्यात येईल. किल्ले शिवनेरीची गडदेवता असलेल्या शिवाईदेवीची पूजा तसेच अभिषेक विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते व प्रांताधिकारी कल्याण पांढरे व तहसीलदार आशा होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर शिवाईदेवी मंदिर ते शिवजन्मस्थळापर्यंत शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. (प्रतिनिधी)