शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

रात्री आठ वाजेपर्यंत करता येईल गौरी आवाहन; बाजारपेठेत खरेदीसाठी उडाली झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 06:05 IST

घराच्या दरवाजापासून ते गौरी बसवायच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणले जातात.

सोलापूर - गणरायाची स्थापना झाल्यानंतर आता सोनपावलांनी माहेरवाशीण गौराईंचे मंगळवारी आगमन होणार आहे. आठ दिवसांपासून श्रीगणेश चतुर्थी व गाैराईंच्या स्वागताची तयारी सुरू होती. मंगळवारी, १० सप्टेंबरला अनुराधा नक्षत्रावर रात्री ८ वाजून ०४ मिनिटांपर्यत कधीही गौरी आवाहन करता येईल, असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

गौराईच्या आगमनानिमित्त खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली आहे. दरम्यान, ज्येष्ठा-कनिष्ठा, महालक्ष्मी-गौरी, सखी-पार्वती अशा जोडीने त्यांना घरात आणण्याची पद्धत आहे. पारंपरिक पद्धतीने नैवेद्य, लाकडी, पितळी सांगाडे त्यांना आकर्षक रंगाच्या साड्या नेसवून साजश्रृंगार केला जातो.  प्रथेनुसार गौराईंना घरात आणताना, जिच्या हातात गौरी असतात त्या महिलेचे पाय दुधाने व पाण्याने धुऊन त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जाते. घराच्या दरवाजापासून ते गौरी बसवायच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणले जातात. गौरीच्या पूजनानंतर पारंपरिक पद्धतीने नैवेद्य दाखविण्यात येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी, महालक्ष्मी पूजा-आरती करून केलेल्या नैवेद्य दाखविला जातो.

बुधवारी पूजन अन् गुरुवारी विसर्जन... ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने ११ सप्टेंबरला बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे, मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने १२ सप्टेंबरला गुरुवारी रात्री ९:५३ पर्यंत विसर्जन करता येईल, असेही पंचांगकर्ते दाते म्हणाले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024