शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘गोसेखुर्द’ अधांतरीच

By admin | Updated: August 6, 2015 01:04 IST

विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाची मान्यता मिळून सहा वर्षे होऊनही हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही.

नंदू परसावार, भंडाराविदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाची मान्यता मिळून सहा वर्षे होऊनही हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पावसावरच विसंबून राहावे लागत आहे.गोसेखुर्दला केंद्र सरकारच्या एआयबीपीअंतर्गत (एक्सिलेरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम) २००९मध्ये राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली. सोबतच निधी देऊन प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने कार्यक्रम आखला होता. मात्र वर्षामागून वर्षे लोटली, परंतु पुनर्वसन झाले नाही. प्रकल्पाच्या डाव्या व उजवा कालव्याचे कामही अपूर्णावस्थेत आहे. कालवा बांधकामात अनियमितता झाल्याचे उघडकीस आल्यानंतर निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली. ही चौकशी अद्याप सुरूच असल्यामुळे केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीत अडचणी येत आहेत. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात ३४ गावे पूर्णत: तर ७० गावे अंशत: बाधित होतात. यात पूर्णत: बाधित ३४ पैकी २८ गावांचे तीन टप्प्यांत विविध ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात १७ गावांचे पुनर्वसन करायचे होते. परंतु यापैकी सहा गावांचे पुनर्वसन न झाल्याने जलस्तर वाढविण्यात अडचणी येत आहेत. तिसऱ्या टप्प्यात १२ पैकी दोनच गावांचे पुनर्वसन झाले आहे.