शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावजवळ रुळाला तडा

By admin | Updated: March 4, 2017 05:45 IST

रुळावरून मालगाडी घसरल्याने १६ तास हार्बर सेवा ठप्प झाल्याची घटना नुकतीच घडली होती.

मुंबई : रुळावरून मालगाडी घसरल्याने १६ तास हार्बर सेवा ठप्प झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी पश्चिम रेल्वेची सेवाही रुळाला तडा गेल्याने दीड तास विस्कळीत झाली आणि ऐन गर्दीच्या वेळी सेवेचा पुरता बोजवारा उडाला. गोरेगाव ते मालाड स्थानकाजवळ घडलेल्या घटनेमुळे २२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते मालाड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर रुळाला तडा गेला. सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे बोरीवली, विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला. त्याची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. तोपर्यंत ज्या स्थानका दरम्यान रुळाला तडा गेला त्या डाऊन मार्गावर लोकलच्या रांगाच लागल्या. जवळपास तीन धीम्या लोकल या एकामागोमाग एक उभ्याच होत्या. डाऊन धीम्या मार्गावर घटना घडल्याने या मार्गावरील लोकल गोरेगाव ते मालाड दरम्यान जलद मार्गावरुन वळवण्यात आल्या. त्याचा परिणाम जलद लोकल फेऱ्यांवरही झाला आणि धीम्या व जलद लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावू लागल्या. यामुळे अंधेरी ते बोरीवली स्थानकांवरील धीम्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची एकच गर्दी उसळली. दरम्यान, रुळांच्या दुरुस्तीचे काम हे दीड तासांत पूर्ण केले आणि त्यानंतर लोकल सेवा पुर्ववत करण्यात आली. परंतु लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने दुपारी बारा वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर लोकलचा गोंधळ दिसून येत होता. (प्रतिनिधी)