शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडे संस्थेला वाटाण्याच्या अक्षता

By admin | Updated: March 22, 2016 04:08 IST

मराठवाड्याचे सुपुत्र आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या प्रस्तावित ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कोणतीही

नजीर शेख,  औरंगाबादमराठवाड्याचे सुपुत्र आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या प्रस्तावित ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कोणतीही स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपरोक्त प्रस्तावाला शासनाने वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत. विद्यापीठात मुंडे यांच्या नावाचे अध्यासन केंद्र असावे, अशी मागणी पुढे आली होती. विद्यापीठाच्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पातही त्यासंबंधी सूतोवाच करण्यात आले होते. अध्यासन केंद्राऐवजी मुंडे यांच्या नावाने विद्यापीठाच्या परिसरात शंभर एकर जागेमध्ये ग्रामविकास व संशोधन संस्था स्थापन करावी, असा विचार प्रशासनाने मांडला. त्यानुसार अडीच लाख रुपये खर्चून प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अर्थसंकल्पाच्या पूर्व बैठकांसाठी औरंगाबादेत आल्यानंतर त्यांच्यासमोर प्रस्तावाचे सादरीकरण झाले. बैठकीला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे, समितीमधील डॉ. सर्जेराव ठोंबरे, गजानन सानप आदींनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन प्रस्ताव सादर केला. मुख्यमंत्र्यांनीही विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले होते.