शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथगडाचे लोकार्पण!

By admin | Updated: December 13, 2015 02:45 IST

गोपीनाथ मुंडे यांचे जीवन कायम संघर्षमय राहिले. त्यांच्या संघर्षातूनच भाजपाला राज्यात सत्ता मिळाली, अशी प्रांजळ कबुली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे

- प्रताप नलावडे, गोपीनाथगड (परळी)गोपीनाथ मुंडे यांचे जीवन कायम संघर्षमय राहिले. त्यांच्या संघर्षातूनच भाजपाला राज्यात सत्ता मिळाली, अशी प्रांजळ कबुली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे शनिवारी मुंडे यांचे स्मारक असलेल्या गोपीनाथगडाच्या लोकार्पण सोहळ््यात दिली.राज्यात भाजपाला वैभव प्राप्त करून देत असतानाच मुंडे यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे काम पोहोचविण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात मुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याच ठिकाणी गोपीनाथगडाच्या माध्यमातून त्यांचे स्मृतिस्थळ तयार करण्यात आले आहे. अष्टकोनी कमळाच्या आकारात समाधिस्थळ असून, त्याची उंची ७२ फूट आहे. त्याच्याच बाजूला २२ फूट उंचीचा त्यांचा पंचधातूपासून तयार केलेला पुतळाही उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण आणि ५० फूट उंचीच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.गोपीनाथगडाची निर्मिती समाजाच्या पैशांतून झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. गोपीनाथरावांच्या मृत्युनंतर पंकजा यांनी नेतृत्व स्वीकारून लोकांना दिलासा दिल्याचेही ते म्हणाले. गोपीनाथगडाच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब आणि मजुरांच्या आर्थिक उन्नतीचा विडा आपण उचलला असून, बाबांना अपेक्षित असलेल्या विकासाचे आणि समाजकार्याचे माध्यम म्हणून हा गड कार्यरत राहणार असल्याची ग्वाही ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. भगवानगडाचे नामदेव महाराज शास्त्री यांनी, आता पंकजाला जे काही मनातील बोलायचे असेल आणि जे काही निर्णय जाहीर करायचे असतील, ते तिने गोपीनाथगडावरून करावेत, असे सांगत भगवानगड हा आता श्रद्धेचा असेल, तर गोपीनाथगड हा राजकारणासाठी असेल, असे स्पष्ट केले. राज्याच्या प्रभारी सरोज पांडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खा. प्रीतम मुंडे, खा. रामदास आठवले, खा. राजू शेट्टी, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. विनायक मेटे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.एक पोते भरून चेकस्मारकासाठी एक वीट आपलीही असावी, असे वाटणारे लोक हे अगदी ऊसतोडणी कामगार म्हणून काम करणारे आहेत. एका महिलेने अकरा रूपये आपल्या हातावर ठेवत गडासाठी हे माझे पैसे घे, असे अधिकारवाणीने सांगितले. गडासाठी आलेल्या पैशांचे चेकने एक पोते भरले असून, दोन कोटी रुपयांचा निधी जमा झाल्याचेही पंकजा यांनी सांगितले.