शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

स.गो.पाचपोळांची ‘माय’ अभ्यासक्रमात समाविष्ट !

By admin | Updated: April 26, 2016 02:09 IST

अखेर मिळाला न्याय; बुलडाणेकरांनी केला होता पाठपुरावा.

बुलडाणा : 'हंबरून वासराले चाटते जवा गाय..' ही स.गो.पाचपोळांची प्रसिद्ध कविता सहावीच्या मराठी पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील स. ग. पाचपोळ हे प्रतिभावंत कवी असले, तरी प्रसिद्धीपराड:मुख असल्याने त्यांच्या कवितांना प्रसिद्धीचे गोंदण मिळाले नाही. औरंगाबादच्या पैठणी प्रकाशनाने ह्यमराठी काव्य परिमलह्ण या नावाने प्रातिनिधिक स्वरूपात काही कवींच्या कवितांचा संग्रह १९८७ साली प्रकाशित केला होता, त्यामध्ये पाचपोळांची ह्यमायह्ण ही कविता सर्वप्रथम प्रकाशित झाली होती. महाराष्ट्र राज्य पाठपुस्तक मंडळाने या कवितेची दखल घेऊन येणार्‍या शैक्षकिण वर्षात सहाव्या वर्गाच्या मराठीच्या पुस्तकात ही कविता समाविष्ट करून स.ग.पाचपोळांच्या प्रतिभेचा गौरव केला आहे. ही मुळ कविता नऊ कडव्यांची असून सहावीच्या पुस्तकात यामधील सात कडवे समाविष्ट केले आहेत.'लोकमत'चा पाठपुरावा !२0११ मध्ये ही कविता प्रख्यात कलावंत जितेंद्र जोशी यांनी मुंबई पोलीसांच्या कार्यक्रमात सादर केली. त्यावेळी त्यांनी नारायण सुर्वे हे या या कवितेचे कवी असून, मुळ कविता हिंदीमध्ये असल्याचे जाहिर केले होते. ही कविता त्यानंतर प्रचंड लोकप्रिय झाली; मात्र मुळ कवी दिवंगत पाचपोळ यांच्यावर एक प्रकारे अन्यायच झाला होता. त्यामुळे बुलडाणा येथील साहित्य वतरुळात खळबळ उडाली होती. येथील उपक्रमशिल ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार यांनी या कवितेच्या कवीचा शोध घेतला व 'लोकमत' ने ही बाब सर्वप्रथम प्रकाशित करून ही कविता स.गो. पाचपोळांची असल्याचे पुराव्यासह सिद्ध केले होते हे विशेष !