शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

गुगलने घेतला मोदींचा धसका

By admin | Updated: May 10, 2016 04:04 IST

भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याचा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नव्या विधेयकाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.

गौरीशंकर घाळे, मुंबईभारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याचा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नव्या विधेयकाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. वर्षानुवर्षे जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला विविदीत भूमी म्हणून रेखाटणा-या गुगल मॅपने सुधारणा केली आहे. गुगल मॅपवरील भारतीय नकाशात आता ही दोन्ही राज्ये भारताचा अविभाज्य भाग म्हणून दाखविण्यात येत आहेत. अलीकडेचे केंद्रातील मोदी सरकारने जियोसॅप्टिअल रेग्युलेशन बिल तयार केले. या विधेयकानुसार भारताच्या नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखविल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासासह १०० कोटी पर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भारताचे चुकीचे नकाशे प्रसारीत होत आहेत. यात भारताच्या आंतराष्ट्रीय सीमा चुकीच्या पद्धतीने रेखाटण्यात आल्या. भारतीय नकाशात जम्मू काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश तुटक रेषेने दाखवून त्यांचा विवादीत क्षेत्र असा उल्लेख करण्यात येत असे. हे प्रकार रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जियोसॅप्टिअल रेग्युलेशन बिल आणले. या बिलातील कठोर तरतूदीचा धसका घेत गुगल मॅपने आपली चूक सुधारली आहे. गुगल मॅपवरील भारतीय नकाशातील तुटक रेषा काढण्यात आल्या असून संपूर्ण जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग म्हणून दाखविण्यात आला आहे.

लवकरच जियोसॅप्टिअल रेग्युलेशन बिल संसदेत मांडण्यात येणार आहे. यानुसार भारतीय नकाशात बदल वा फेरफार करायचा असल्यास सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या विधेयकात परवान्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे सॅटलाइट, एअरक्राफ्ट, एअरशिप, बलून माध्यमातून चुकीचा नकाशा दाखवता येणार नाही. >काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून भारताच्या नकाशात काश्मीर चीनचा भाग तर जम्मू पाकिस्तानात असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यावेळी केंद्र सरकारने नकाशात सुधारणा केली होती. मायक्रोसॉफ्ट, गुगल व इतर अमेरिकी कंपन्या सर्रास भारताच्या नकाशात फेरफार करत चुकीचा नकाशा पसरवित असल्याचा आरोप होत असतो. मायक्रोसॉफ्ट तसेच गुगलच्या वेबसाइटवर संपूर्ण काश्मीर पाकिस्तानमध्ये तर अक्साई चीन हा भारताचा भूभाग चीनमध्ये दाखविला जायचा.वारंवार चुकीचा नकाशा दाखविल्याबद्दल अलीकडेच अल जझिरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीचे भारतातील प्रक्षेपण पाच दिवसांसाठी थांबविण्यात आले होते. तर भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा चुकीच्या पद्धतीने दाखविल्याने गुगल मॅप्सविरोधात गेल्या डिसेंबरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.