शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुगल फिरवू शकते निवडणुकीचा निकाल - सर्वे

By admin | Updated: May 13, 2014 17:32 IST

भारतात अनेक मतदार हे गोंधळलेल्या मनस्थितीत असल्याने त्यांना कोणाकडे वळवायचे याची ताकत गुगलमध्ये आहे.

ऑनलाइन टीम 
वॉशिग्टंन, दि. १३ - भारतात अनेक मतदार हे गोंधळलेल्या मनस्थितीत असल्याने त्यांना कोणाकडे वळवायचे याची ताकत गुगलमध्ये आहे असे सांगत निवडणुकीचा निकाल गुगल फिरवू शकते असे अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामधील रिसर्च सायक्लोजिस्ट अमेरिकन इन्स्टिट्यूटने केलेल्या एका सर्वेत म्हटले आहे. 
रिसर्च एन्ड टेक्नोलॉजी कॅलिफोर्नियातील वरिष्ठ संशोधक डॉ. रॉबर्ट एप्स्टेन यांच्या नेतृत्वाखाली हा सर्वे करण्यात आला असून हा सर्व प्रकार म्हणजे भारतातील लोकशाहीसाठी मोठा संवेदनशील विषय असल्याचे डॉ. रॉबर्ट यांनी सांगितले. गुगलवर सर्वाधिक रॅकिंग असणा-या व्यक्तीवर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. म्हणूनच कंपन्याही उत्पादनाचे रॅकिंग वाढविण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करतात, असे सर्वेमध्ये म्हटले आहे. 
गुगलमध्ये सर्वाधीक सर्च केलेल्या यादीमध्ये नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा अरविंद केजरीवाल यांची रॅकिंग अधिक असल्याचे स्पष्ट झाल्यास केजरीवाल यांच्याकडे मतदार वळू शकतो असा या सर्वेमध्ये निष्कर्ष काढण्यात आला आहे. मतदान कोणाला करायचे याविषयी संभ्रमात असलेल्या जवळपास  १५ टक्के पेक्षाही अधिक मतदार अन्य उमेदवारांकडे आकर्षित झाले होते असे गेल्यावर्षी अमेरिकेत करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये स्पष्ट झाल्याचे डॉ. रॉबर्ट एप्स्टेन यांनी म्हटले आहे. तर भारतामध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये अशाच पध्दतीने २ हजार मतदारांना दुस-या उमेदवारांकडे वळविण्यात यश आले होते. तसेच काही मतदारांना दुप्पट पैसे दिल्यानंतर त्यांचे मतदान अन्य उमेदवारांकडे फिरविण्यात यश आल्याचे सर्वेमध्ये म्हटले आहे. ३५ वर्षे वय पार केलेल्या १९ टक्के महिला या सहज आपले अमूल्य मत गुगलवरील माहितीच्या आणि छायाचित्राच्या आधारे फिरवू शकतात तसेच १८ टक्के अशिक्षित लोक आपले मत सहज फिरवितात असे या सर्वेमध्ये सांगण्यात आले आहे. आम्ही केलेल्या वैयक्तिक सर्वेमध्ये ९९ टक्के लोकांचा कल गुगलवरील माहितीवरून वेगळया उमेदवारांच्या बाजुने जावू शकतो असे सर्वेक्षणात आढळून आल्याचे डॉ. रॉबर्ट एप्स्टेन यांनी सांगितले.