शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर गजबज; पण सुरक्षेचे काय?

By admin | Updated: July 1, 2016 02:21 IST

नाइटलाइफच्या निमित्ताने धनदांडग्यांची सुरू होणारी चंगळ पोलिसांसाठी मात्र डोकेदुखी ठरणारी आहे.

मुंबई : नाइटलाइफच्या निमित्ताने धनदांडग्यांची सुरू होणारी चंगळ पोलिसांसाठी मात्र डोकेदुखी ठरणारी आहे. रात्रीच्या वेळी महिला सुरक्षेबरोबरच, नशेबाज, गर्दुल्ले, स्मगलर यांसह कायदा व सुव्यवस्थेचा अतिरिक्त भार पोलिसांवर पडणार आहे. अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारावर यावर कशा पद्धतीने नियंत्रण आणायचे याबाबत पोलीस दलात चर्चा सुरू झाली आहे.मुंबई पोलीस दलातील ३५ हजार पोलिसांच्या फौजफाट्यावर मुंबईकरांची सुरक्षा आहे. मुंबईकरांना पुरेसे संरक्षण नाही. शक्ती मिल आणि इस्थर अनुह्यासारखी प्रकरणे अद्याप ताजी आहेत. मुंबईचा वाढता आवाका लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा कमी पडते. रात्रीही मुंबई व्यापार-पर्यटनाच्या माध्यमातून सुरू झाल्यास त्याचा ताण नक्की येणार आहे. मुंबईला खरोखर पाश्चिमात्य देशांमधील शहरांसारखा नाइटलाइफचा दर्जा द्यायचा असल्यास सर्वप्रथम पोलिसांचे मुबलक संख्याबळ वाढविणे, त्यांचे सक्षमीकरण, आधुनिकीकरणासाठी त्यांना पुरेशा नागरी सुविधा देणे आणि कायद्यातील शिक्षा कडक करून गुन्हेगारांच्या मनात कायद्याची जरब बसविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. या साऱ्यांचा विचार करता, नाइटलाइफआधी मुंबईकरांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी आग्रह धरावा आणि मगच नाइटलाइफचा अट्टाहास करणे योग्य असल्याचे निवृत्त एसीपी वसंत ढोबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वाहतूक पोलिसांवरही ताणया निर्णयामुळे मुंबई वाहतूक पोलिसांवर मात्र कामाचा प्रचंड ताण वाढणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. सध्या ३,३00 एवढे मनुष्यबळ मुंबई वाहतूक पोलिसांकडे असून, दुप्पट मनुष्यबळाची गरज असतानाही तेवढ्याच मनुष्यबळात काम करावे लागत आहे. लाखोंच्या संख्येने होत असलेल्या केसेस आणि कमी मनुष्यबळ असल्याने वाहतूक पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. नाइटलाइफला परवानगी मिळाल्याने हा ताण आणखीच वाढेल, अशी भीतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दारू पिऊन वाहन चालवणे तसेच बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना रोखण्यासाठी २00 ते २५0च्या दरम्यान वाहतूक पोलीस तैनात असतात. नाइटलाइफ सुरू झाल्यावर त्यांची संख्या अधिक वाढवावी लागेल.‘अनेक गोष्टींची तरतूद करावी लागेल’टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागाच्या सहायक प्राध्यापक अस्फा डोकाडिया यांनी सांगितले, नव्या निर्णयाचे स्वागत आहे. रात्री कामावरून घरी येणाऱ्या महिलांना यामुळे दिलासा मिळेल. कोणत्याही क्षणी वस्तू मिळू शकतील. असे असले तरी या नाइटलाइफसाठी अनेक गोष्टींची तरतूद करणे आवश्यक आहे. कामगारांना यासाठी विशेष ट्रेनिंगसुद्धा देणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे अनेक अडचणी सुटतील.‘रात्रीच्या वेळी सुविधा असणे चांगले’ : सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदुगडे म्हणाले, ‘नाइटलाइफ’ या शब्दाला वेगळेच ग्लॅमर दिल्यामुळे याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मुंबई हे शहर कधीही न थांबणारे आहे. येथे हजारो कामगार काम करीत असतात. त्यांच्यासाठी रात्रीच्या वेळी सुविधा उपलब्ध असणे चांगलेच आहे. त्यामुळे या निर्णयाला पाठिंबा आहे. सर्वसामान्यांनीही या नजरेने पाहिले तर ते वावगे वाटणार नाही.