शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेसाठी खुशखबर, १३ अतिरिक्त लोकल वाढणार

By admin | Updated: March 16, 2016 20:27 IST

१९ मार्चपासून मध्यरेल्वेच्या प्रवाश्यांना खुशबर मिळणार आहे कारण मध्यरेल्वेने सीएसटी ते अंबरनाथ दरम्यान १३ अतिरिक्त लोकल गाड्या वाढवण्याचे ठरवले आहे. तर ५ लोकल गाड्याचा विस्तार होणार आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - दररोराज लोकल मधील वाढणारी गर्दी आणि होणारे अपघात यामुळे रेल्वे प्रशासनाने मध्यरेल्वेवर लोकलची संख्या वाढवण्याचे ठरवले आहे. मध्यतंरी रेल्वे प्रशासनाने हार्बर रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या वाढवताना मध्य रेल्वेकडे दुर्लक्ष केले होते.
 
१९ मार्चपासून मध्यरेल्वेच्या प्रवाश्यांना खुशबर मिळणार आहे कारण मध्यरेल्वेने सीएसटी ते अंबरनाथ दरम्यान १३ अतिरिक्त लोकल गाड्या वाढवण्याचे ठरवले आहे. तर ५ लोकल गाड्याचा विस्तार होणार आहे. सध्या ज्या गाड्या ९ बोगीच्या आहेत त्या १२ बोगीच्या होणार आहेत. गर्दीमुळे धावत्या गाडीतून पडून होणाऱ्या मृत्यूंची दखल घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असेच म्हणावे लागेल.
 
ठाणे ते कल्याण या पट्ट्यात गेल्या काही दिवसांत लोकलमधून पडून प्रवासी मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेऊन त्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सूद यांना पत्र देऊन, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याणदरम्यान सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली. हार्बर मार्गावरील फेऱ्या वाढवल्याबद्दल मध्य रेल्वेचे अभिनंदन करतानाच, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या स्थानकांवरची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, या मार्गांवर अपघातांचे प्रमाणदेखील वाढले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
 
मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी ठाण्याच्या पुढे ११ फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. २१ मार्चपूर्वी या फेऱ्या सुरू होणार असून त्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले होते.